Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 5 April 2025
webdunia

काय आहे 5 लाखाचे इमरजेंसी कर्जाचे सत्य, SBI ने ग्राहकांना केलं सावध

SBI big statement on emergency loan of 5 lakhs
, बुधवार, 13 मे 2020 (14:57 IST)
सध्या कोरोनाच्या काळात सोशल मीडियावर अनेक प्रकारांच्या अफवा आणि बनावटी बातम्या सुरू आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पष्टीकरण दिले आहे की ते आपल्या योनो (yono) प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे आपत्कालीन कर्ज किंवा आणीबाणीचे कर्ज देत नाहीत. 
 
बातमी अशी येत आहे की एसबीआय 45 मिनिटात 5 लाख रुपयापर्यंत आणीबाणी कर्ज देऊ बघत आहे. ग्राहकांना हे कर्ज 10.5 टक्क्यांचा व्याजदराने दिले जातील. या कर्जाची ईएमआय(EMI) 6 महिन्यानंतर सुरू होईल.
 
एसबीआयने यावर आपले स्पष्टीकरण देत सांगितले आहे की योनोमार्फत एसबीआय द्वारा आपत्कालीन किंवा आणीबाणीच्या कर्ज योजनेतंर्गत आम्ही कोणतेही ऋण देत नाहीये. आम्ही आपल्या ग्राहकांना अश्या प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका अशी विनंती करीत आहोत.
 
एसबीआयने ट्विट करून आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे. परंतु एसबीआयने असे ही म्हटले आहे की ते आपल्या पगार झालेल्या ग्राहकांना दिलासा मिळावा या दृष्टीने योनो मार्फत पूर्व मंजूर वैयक्तिक (प्री-अप्रूव्ड पर्सनल लोन) कर्जाची ऑफर सुरू करण्याचा विचार करत आहे. 
 
कोरोना व्हायरसच्या वैश्विक महामारीने निर्माण झालेल्या संकटामुळे ग्राहक रोख(नगदी)च्या समस्येशी झटत आहे. त्यांच्यासाठी ही सुविधा सुरू करण्याचे काम चालले आहे.
 
योनो म्हणजेच 'यू ओनली नीड वन', एसबीआयचा एक डिजीटल प्लॅटफार्म असून या द्वारे एसबीआय 
आपल्या ग्राहकांना बँकिंग, शॉपिंग लाइफस्टाइल, आणि गुंतवणुकीच्या गरजेसाठी एकाच ठिकाणी समाधान मिळवून देतं. योनो हे ऍप एसबीआय ने नोव्हेंबर 2017 मध्ये आणले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'व्होकल फॉर लोकल': 1 जूनपासून निमलष्करी दलाच्या कॅन्टिनमध्ये फक्त स्वदेशी उत्पादने विकली जातील