Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली एकनाथ खडसे यांना ऑफर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली एकनाथ खडसे यांना ऑफर
, गुरूवार, 14 मे 2020 (05:22 IST)
भाजपमध्ये नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ऑफर दिली आहे. खडसे समर्थ आणि जनमानसाचा आधार असलेले नेते आहेत. असा नेता काँग्रेसमध्ये येत असेल, तर त्याचे स्वागतच करू, असं थोरात म्हणाले आहेत.
 
'मी खडसेंना फोन केला होता. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं त्यांना सांगितलं होतं. खडसेंची अवहेलना पाहावत नाही. कोणताही पक्ष समर्थ नेत्याला जवळ करण्याचा प्रयत्न करतो,' असं सूचक वक्तव्य थोरात यांनी केलं.
 
'भाजपमध्ये जनमानसाचा आधार असणारा नेता नको असतो. भाजप परप्रकाशित लोकं जवळ करतात. बहुजन समाजातील लोकांचा प्रभाव वाढू नये, याची काळजी भाजपमध्ये घेतली जाते,' असा आरोपही थोरात यांनी केला. भाजपमध्ये लोकशाही नाही, हे खडसेंच्या उशीरा लक्षात आलं. पक्षाचा अंतरंग त्यांना आत राहून समजले नाहीत, त्यांनी ते बाहेरुन बघायला हवं. एका ज्येष्ठ नेत्याचा फोन न घेणं योग्य दिसत नाही. भाजपच्या नाराज नेत्यांनी, त्याचबरोबर समाजानेही ओळखलं पाहिजे की भाजपची रणनिती आपल्या हिताची आहे का? राज्याच्या, देशाच्या हिताचं आहे का?', अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Honda च्या देशातील 155 डीलरशीप सुरू होण्याच्या तयारीत : कंपनीची घोषणा