Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोबाइलचा वापर करीत असल्यास तर जपून करा, आपणांस देखील कोरोना होऊ शकतो, अश्या प्रकारे सावधगिरी बाळगा

मोबाइलचा वापर करीत असल्यास तर जपून करा, आपणांस देखील कोरोना होऊ शकतो, अश्या प्रकारे सावधगिरी बाळगा
, सोमवार, 17 ऑगस्ट 2020 (08:57 IST)
कोरोनाचे प्रादुर्भाव कमी होण्याचे नावच घेत नाही. सुरुवातीच्या लॉक डाऊनमध्ये जेथे सामान्य ते विशेषतः मास्क आणि सेनेटाईझरचा वापर संपूर्ण दक्षतेसह करीत होते. या मुळे संसर्गाची गती कमी होती. लोक संसर्गाबद्दल निष्काळजी झाले, तर संसर्गाची गती देखील वाढली. आता जिल्ह्यात सतत संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. तोंड आणि नाकाच्याद्वारे कोरोना संसर्गाच्या जोखमीबद्दल लोकं सावधगिरी बाळगत आहे. यासाठी लोकं मास्कचा वापर करत आहे. पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की कोरोना कानाच्या माध्यमातून देखील ठोठावू शकतो. मोबाईल देखील कोरोनाच्या संसर्गासाठी कारणीभूत ठरू शकतो.  कारण मोबाइलवर बोलताना आपण त्याला कानाच्या एका बाजूस ठेवतो, तेच मोबाइलचे स्क्रीन आपल्या तोंड आणि नाका जवळ असतो.
 
तज्ज्ञ सांगतात की मोबाइलवर बोलताना जागरूक राहणे आवश्यक आहे. मोबाइलच्या स्क्रीनला एका स्वच्छ कापड्याने किंवा सेनेटाईझरने स्वच्छ करून विषाणूंच्या शक्यतेस कमी करू शकतो. ते म्हणतात की मोबाइलपासून कोरोना पसरण्याची शक्यता असते. अश्या परिस्थितीत, बोलण्यापूर्वी आपण मोबाईल स्क्रीनला स्वच्छ करणं महत्त्वाचे आहे. विषाणू मोबाइलच्या स्क्रीनवर बऱ्याच तास जिवंत राहू शकतं. म्हणून मोबाईल वापरण्याच्या पूर्वी त्याला स्वच्छ करावं. हेच नव्हे तर कोणा दुसऱ्याचा मोबाईल वापरणं टाळावं. मुलांना मोबाईल देण्यापूर्वी त्याला स्वच्छ करावं. या जीवघेण्या विषाणूंपासून वाचण्यासाठी आपल्या हाताला चांगल्या प्रकारे सेनेटाईझ करावं किंवा नियमित अंतराने साबणाने हात स्वच्छ करावं. या व्यतिरिक्त हाताने तोंड, नाक आणि डोळे स्पर्श करू नये. शारीरिक अंतराचे अनिवार्य रूपाने अनुसरणं करावं.
 
किमान 2 वेळा सेनेटाईझरने फोन स्क्रीन स्वच्छ करावं -
 
तज्ज्ञ सांगतात की कोरोना संसर्गाची भीती बाळगण्याची काहीच गरज नाही, कारण हे संसर्ग कोणा व्यक्तीच्या किंवा जागेच्या संपर्कात आल्यानंतरच पसरतं. त्यासाठी आपण आपले हात नियमित अंतरावर धुवत राहा आणि आपल्या मोबाइलच्या स्क्रीनला स्वच्छ राखा. मोबाईल वापरल्यावर आपल्या हाताला स्वच्छ करा. काही तासाच्या कालावधीनंतर मोबाइलच्या स्क्रीनला स्वच्छ कपड्या ने किंवा सेनेटाईझर ने स्वच्छ करावं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धरणांमधून मोठा विसर्ग; कोल्हापूर, सांगलीला पुराचा धोका