Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या रुग्णांत वाढ

coorna
, रविवार, 7 जानेवारी 2024 (14:15 IST)
सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे. देशात पुन्हा कोरोनाचा नवा व्हेरियंट J 1 .N हा पसरत आहे. देशातील काही राहात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. 24 तासांत हा वाढणारा आकडा चिंताजनक आहे.आरोग्य विभाग नागरिकांना काळजी घेण्यास सांगत आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 146 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. सध्या घाबरून जाण्यासारखी स्थिती जरी नसली तरीही लोकांना खबरदारी आणि काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे. सध्या तरी कोरोनाचा धोका नाही तरीही हा संसर्ग कधी वेग धरेल हे सांगू शकत नाही. पण कोरोनाबाधितांचा वाढणारा आकडा हा चिंतादायक आहे. 

नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. तसेच स्वच्छतेची काळजी घ्यावी. सामाजिक अंतर राखावा. घाबरून न जाता काळजी घ्यावी.असे आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला आहे.   
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.17 टक्के आहे. तर सध्या राज्यातील मत्यृदर हा 1.81टक्के एवढा आहे. 

Edited By- Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Talathi Bharti Result 2023 Merit List : तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर