Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना लशीचा फक्त एकच डोस! Sputnik Light च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला मंजुरी

कोरोना लशीचा फक्त एकच डोस! Sputnik Light च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला मंजुरी
, बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (16:02 IST)
भारतात सुरु असलेल्या लसीकरणासंदर्भात एक आनंदाची बातमी म्हणजे रशियाची स्पुटनिक लाइटला (Sputnik Light) भारतातील तिसऱ्या टप्प्यातील ब्रिजिंग ट्रायलला मंजूरी मिळाली आहे.
 
ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने भारतातील लोकसंख्येवर लसीकरणाच्या परिक्षणासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. अशाने लवकरच भारतात कोरोनाशी लढण्यासाठी आणखी एक शस्त्र सापडेल. सिंगल डोस लसीमुळे लसीकरणाचा वेग आणखी वाढेल. या लसीचा एक डोस मिळाल्यानंतर दुसऱ्या डोसची गरज भासणार नाही.
 
आतापर्यंत भारतात उपलब्ध सर्व लसींचे 2 डोस दिले जातात. कोविशील्ड, कोवाक्सिन, स्पुटनिक-व्ही इत्यादी लस सध्या भारतातील लोकांना मोठ्या प्रमाणात दिल्या जात आहेत. कोरोना विषयातील विषय तज्ज्ञ समितीने (एसईसी) स्पुतनिक लाइटच्या चाचणीला मंजुरी देण्याची शिफारस केली होती.
 
हे लक्षात घेण्यासारखे आहे की स्पुटनिक लाइट लसीच्या आणीबाणीच्या वापरास मान्यता देण्यासाठी जुलैमध्ये केलेली शिफारस सीडीएससीओच्या विषय तज्ञ समितीने नाकारली होती. त्यावेळी समितीने म्हटले होते की, भारतीय लोकसंख्येवर या लसीची चाचणी केलेली नाही, त्यामुळे त्याला परवानगी देता येणार नाही.
 
त्यावेळी कंपनीने म्हटले होते की स्पुतनिक लाइटमध्ये स्पूतनिक-व्ही सारखेच घटक आहेत. तथापि, दोघांमधील सर्वात मोठा फरक डोसचा आहे. हे एकाचे दोन डोस घ्यावे लागतात तर दुसर्‍याचा एक डोस पुरेसा ठरेल. तथापि, लैंसेट अभ्यासानुसार, स्पुतनिक-व्ही लस कोरोनाविरूद्ध अधिक प्रभावी आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘काका-पुतण्याच्या’ टोळीनं ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ बळकावलेली 113 एकर जमीन मोकळी केली’ – पडळकर