करोना व्हायरसमधून पूर्णपणे बऱ्या झालेल्या कनिका कपूरने प्लाझ्मा डोनेट करण्याचा निर्णय घेतला आहे. प्लाझ्मा थेरपीमुळे गंभीर अवस्थेत असलेल्या अनेक रुग्णांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली आहे.
लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल हॉस्पिटलमधील डॉक्टरांची टीम कनिका कपूरच्या रक्ताची तपासणी करणार आहे. त्यानंतरच ती प्लाझ्मा डोनेट करु शकते का? ते स्पष्ट होईल.डॉक्टरांनी परवानगी दिली तर कनिका कपूर २८ किंवा २९ एप्रिलला केजीएमयू रुग्णालयात प्लाझ्मा डोनेट करेल.