Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

महाराष्ट्रात बुधवारी कोरोनाचे 63 हजार 309 नवे रुग्ण आढळले

Maharashtra 28 April corona udpates live
, बुधवार, 28 एप्रिल 2021 (21:12 IST)
महाराष्ट्रात बुधवारी (28 एप्रिल) कोरोनाचे 63 हजार 309 नवे रुग्ण आढळले, तर 985 मृत्यूंची नोंद झाली आहे.
 
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या 6 लाख 73 हजार 481 वर गेली आहे.
 
बुधवारी (28 एप्रिल) मुंबई मनपा क्षेत्रात 4926, ठाणे मनपा क्षेत्रात 942, पुणे मनपा क्षेत्रात 4126, तर नागपूर मनपा क्षेत्रात 5418 रुग्ण आढळले.
 
महाराष्ट्रात 28 एप्रिलला 61 हजार 181 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्याचा रिकव्हरी रेट 83.4 % वर गेला आहे.
 
28 एप्रिलला एकूण 985 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. यापैकी 392 मृत्यू गेल्या 48 तासांत नोंदवण्यात आले असून 251 मृत्यू हे गेल्या आठवड्यातले आहेत. 342 मृत्यू हे त्यापूर्वीच्या कालावधीतले असल्याचं राज्य सरकारच्या पत्रकात म्हटलंय.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नारायण दाभाडकर यांनी खरंच तरुण रुग्णासाठी त्यांचा बेड दिला?