Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लसीचे दोन्ही डोस सर्वाधिक नागरिकांना देण्यात महाराष्ट्र अव्वल

लसीचे दोन्ही डोस सर्वाधिक नागरिकांना देण्यात महाराष्ट्र अव्वल
, शनिवार, 8 मे 2021 (08:38 IST)
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात केवळ लसीचे सर्वाधिक डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल नाही तर राज्यातील 28 लाख 66 हजार 631 नागरिकांना दोन्ही डोस देऊन त्यांना संरक्षित करण्या कामीही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. आजपर्यंत लसीकरण मोहिमेत 1 कोटी 67 लाख 81 हजार 719 डोस देण्यात आले आहेत.
 
दरम्यान, 5 मे रोजी महाराष्ट्रात 1586 लसीकरण केंद्रांद्वारे एकूण 2 लाख 59 हजार 685 नागरिकांना लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये 18 ते 44 वयोगटातील 1 लाख 53 हजार 967 नागरिकांचा समावेश आहे.
 
राज्यामध्ये आतापर्यंत 1 कोटी 39 लाख 15 हजार 88 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला तर 28 लाख 66 हजार 631 नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून सर्वाधिक नागरिकांना दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्येही महाराष्ट्र पहिला असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
 
महाराष्ट्राने लसीकरणात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. त्याच बरोबर लस वाया जाण्याचे महाराष्ट्राचे प्रमाण केवळ 1 टक्के आहे. लसीचा योग्य वापर करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी वेळोवेळी अभिनंदनही केले आहे.
 
इतर राज्यांतील लसीकरणाची स्थिती
राजस्थान – 1 कोटी 35 लाख 97 हजार
गुजरात – 1 कोटी 32 लाख 31 हजार
पश्चिम बंगाल – 1 कोटी 14 लाख 75 हजार कर्नाटक – 1 कोटी 1 लाख 11 हजार इतके

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महापालिकेची 15 लाख लस खरेदीची तयारी; राज्य सरकारने परवानगी द्यावी – महापौर