Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ३१, बरे होण्याचे प्रमाण ९७.६३ टक्के

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ३१, बरे होण्याचे प्रमाण ९७.६३ टक्के
, शनिवार, 31 जुलै 2021 (18:15 IST)
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९२ हजार ८५७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत १ हजार ३१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ५०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २०, बागलाण १६, चांदवड ३२, देवळा १६, दिंडोरी २७, इगतपुरी ०६, कळवण ०७, मालेगाव २६, नांदगाव २६, निफाड ६८, पेठ ०१, सिन्नर ९२, सुरगाणा ००, त्र्यंबकेश्वर ०३, येवला ३६ असे एकूण ३७६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ६०० मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ५२ तर जिल्ह्याबाहेरील ०३ रुग्ण असून असे एकूण १ हजार ३१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख २ हजार ३९७ रुग्ण आढळून आले आहेत.रुग्ण बरे होण्याची टक्केवारीजिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९७.०७ टक्के, नाशिक शहरात ९८.०१ टक्के, मालेगाव मध्ये ९६.७५ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.६८ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.६३ इतके आहे.
 
 :नाशिक ग्रामीण ४ हजार ८४ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३ हजार ९४२ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५७ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ५०९ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.– ४ लाख २ हजार ३९७ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख ९२ हजार ८५७ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १ हजार ३१ पॉझिटिव्ह रुग्ण.– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.६३ टक्के.(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाबुल सुप्रियोचे राजकारणातून संन्यास