चीन मधील लॅबमध्ये कोरोनावर उपचार करण्यासाठी एक प्रभावी औषधं विकसित केलं आहे. चीनच्या लॅबचा असा दावा आहे की, या औषधामध्ये कोरोना विषाणूला रोखण्याची शक्ती आहे. चीनच्या प्रतिष्ठित पेकिंग न्युनिव्हर्सिटीमधील वैज्ञानिकांकडून या औषधाची चाचणी करण्यात आली आहे. या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, हे औषधं फक्त कोरोनाबाधित रुग्ण रिकव्हर होण्यास मदत करते. तसेच या काळात लोकांमध्ये विषाणूशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील मदत करते.
बीजिंग अॅडव्हान्स इनोव्हेशन सेंटर फॉर जिओनॉमिक्स न्युनिव्हर्सिटीच्या विभागाचे संचालक सनी झी यांनी एएफपीला सांगितले की, प्राण्यांवर या औषधाची चाचणी यशस्वी झाली आहे. ते पुढे म्हणाले की, जेव्हा आम्ही एका उंदीला न्यूट्रिलाइजिंग अँटीबॉडी इजेक्शन दिले. तेव्हा पाच दिवसांनंतर विषाणू थोड्याप्रमाणात कमी झाला. याचा अर्थ असा की चीनने तयार केलेले औषध हे लसीपेक्षा प्रभावी आहे. जर्नल सेलमध्ये या संशोधनाची माहिती प्रसिद्ध झाली आहे. हे औषध शोधण्यासाठी झी यांच्या टीमने रात्रंदिवस काम केले आहे.