कोविशील्ड लसीकरणाच्या संदर्भात केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना दिल्या नंतर आता आरोग्य विभागाने दुसऱ्या डोसच्या लसीकरणाबाबत सुधारित वेळापत्रक जारी केले आहे. या सुधारित वेळा पत्रकात, 24 फेब्रुवारी ते 31 मार्च कोविशील्ड आणि कोवॅक्सीन लसीकरण घेणाऱ्यांना दुसरा डोस कधी घ्यायचा आहे हे सांगितले आहे. केंद्राच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार कोविशील्ड लसीचा दुसरा डोस घेण्याची मुदत जी पूर्वी 28 ते 42 दिवसांची होती आता 42 ते 56 दिवसांची करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने कोविशील्डच्या संदर्भात नवीन गाईडलाईन जारी करण्यापूर्वी लसीकरणाची पूर्ण मुदत 0/28/42 होती.या मध्ये पहिला डोस लागल्यावर 28 दिवसानंतर दुसरा डोस आणि त्याच्या 14 दिवसांनी अँटीबॉडी चाचणी होती.
कोविशील्ड लसीकरणाचा दुसरा डोस घेण्याची अवधी वाढविण्याचा निर्णय नॅशनल टेक्निक अडवायजरी,ग्रुप ऑन इम्युनायजेशन आणि नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन वॅक्सीन ऍडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-19 (NEGVAC)च्या अहवालावर घेण्यात आला आहे.
युरोपातील काही देशांमध्ये ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेका लसी साठी 4 -8 आठवड्यांचा मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात होते. त्याच्या परिणामांतर कोविशील्डसाठी हे मार्गदर्शक तत्व अवलंबविली जात आहे.
तज्ज्ञाच्या मतानुसार जर आपण कोविशील्ड लसीचा एक डोस घेतला आहे तर आपण दुसरा डोस देखील कोविशील्डचाच घ्यावे. प्रथम घेतल्यावर दुसरा डोस देखील घेतला पाहिजे. आपल्याला दिलेल्या तारखेवर स्वतःहून पोहचून दुसरा डोस घ्यावा. या संदर्भात आपल्या कडे कोणताही मेसेज येणार नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे लसीकरण कोवीन (Co-Win)अॅप मधील बदल होणे आहे.