विवो ने आपल्या फोनच्या किमतीत मोठी कपात केली असून हा विवोचा V 20 स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये विवो ने 2000 रुपयांची कपात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विवो चा स्मार्ट फोन 8 जीबी रॅम आणि 128 आणि 256 जीबी स्टोरेजसह येतो. विवोचा हा फोन ऑक्टोबर मध्ये लॉन्च केला होता. या फोन ची किंमत 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची 22,999 रुपये करण्यात आली आहे. या पूर्वी या फोन ची किंमत 24 ,990 रुपये होती. विवो V20 या 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या या फोन ची सुरुवातीची किंमत 27,990 रुपये होती आता ही किमतीमध्ये कपात करून 25,990 रुपये करण्यात आली आहे.
फोनचे फीचर्स -या फोन मध्ये 6.44 इंचाचे फुल एचडी + अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 1080X2400 पिक्सलचे आहे. फोनमध्ये वॉटर ड्रॉप नॉच दिला आहे. विवोचा हा स्मार्टफोन अँड्रॉयड 11 वर बेस्ड FuntouchOS 11 वर काम करतो. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसर देण्यात आले आहे.
स्मार्टफोन ची बॅटरी 4,000 mAh ची आहे . या शिवाय या फोनला 33वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. विवोच्या या स्मार्टफोन मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिले आहे. स्मार्टफोनमध्ये बॅक मेन कॅमेरा 64 मेगापिक्सल दिले आहे. याशिवाय बॅकमध्ये 8 मेगापिक्सलचे सेकंडरी लेन्स आणि 2 मेगापिक्सलचे मोनो सेन्सर दिले आहे. विवोच्या या स्मार्टफोनमध्ये 44 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.