महाराष्ट्रातही कोरोनाचे नवे व्हेरियंट अर्थात स्ट्रेन आढळत आहेत. महाराष्ट्रात तपासण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये डिसेंबर २०२० च्या तुलनेत E484Q आणि L452F व्हेरियंट आढळले आहे. हे व्हेरियंटमुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असून संक्रमित रुग्णांची संख्या पून्हा वाढत आहे. १५ ते २० टक्के चाचण्यांमध्ये नवे व्हेरियंट आढळत आहे. महाराष्ट्रासह केरळमध्येही कोरोनाचे नवे व्हेरियंट आढळत आहेत. केरळमधील १४ जिल्ह्यामधील २०३२ कोरोना पॉझिटिव्ह चाचण्यांमध्ये N440K हा कोरोनाचा नवा व्हेरियंट सापडला आहे. तर आंध्रप्रदेशातील ३३ टक्के चाचण्यांमध्ये N440K हा व्हेरियंट सापडला आहे. तर तेलंगणामध्येही ५३ टक्के चाचण्यांमध्ये हा व्हेरियंट मिळाला आहे.
त्याचप्रमाणे युके, सिंगापूर, जपान, ऑस्ट्रेलियासग १६ विविध देशांमध्येही कोरोनाचा हा नवा व्हेरियंट सापडत आहे. देशात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या २४ तासांत सर्वाधित म्हणजे ४७ हजार कोरोना केसेस समोर आल्या आहेत. यातील ५० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे या नव्या व्हेरियंटमुळे कोरोना रुग्ण आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.