Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत मंगळवारी एकाही कोरोना बाधिताच्या मृत्यूची नोंद नाही

मुंबईत मंगळवारी एकाही कोरोना बाधिताच्या मृत्यूची नोंद नाही
, बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (08:58 IST)
मुंबई शहरात मंगळवारी एकाही कोरोना बाधिताच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. या वर्षांच्या सुरुवातीला २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद करण्यात आली होती, त्यानंतर मंगळवारी पुन्हा कोरोना बाधित मृत्यूची संख्या शून्यावर आली आहे, अशी माहिती पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे. मंगळवारी प्रतिबंधित परिसर आणि इमारतींची संख्याही शून्यच असल्याचे पालिकेने दिलेल्या कोरोना आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
 
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोना चा पहिला रुग्ण ‘मार्च २०२०’ मध्ये आढळून आला होता. त्यानंतर १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा ‘शून्य’ मृत्यूची नोंद महानगरपालिका क्षेत्रात झाली होती. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सात वेळा ‘शून्य’ मृत्यूची नोंद झाली होती, तर या वर्षी २ जानेवारीनंतर आज पहिल्यांदाच पुन्हा ‘शून्य’ मृत्यूची नोंद झाली आहे. शहरात आज २३५ कोरोना  रुग्णांची नोंद झाली. तर ४४६ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या एकूण २३०१ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के असून रुग्ण दुपटीचा दरही १९३० दिवसांवर पोहोचला आहे.
 
राज्यात २,८३१ नवे रुग्ण
राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख घसरत असून मंगळवारी  २,८३१ नवीन कोरोना  रुग्णांची नोंद झाली, तर ३५ रुग्णांचे मृत्यू झाले. उपचाराधीन रुग्णांची संख्या ३०५४७ झाली आहे. राज्यात दिवसभरात ओमायक्रॉनचे ३५१ रुग्ण आढळून आले असून आतापर्यंतची रुग्णसंख्या ४३४५ झाली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पण त्यातील स देखील बाहेर आला नाही :मनसे