Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लॉकडाउन उठेल असे कुणी गृहीत धरू नये : टोपे

लॉकडाउन उठेल असे कुणी गृहीत धरू नये  : टोपे
मुंबई , मंगळवार, 7 एप्रिल 2020 (16:12 IST)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भावरोखणसाठी राज्यात लागू केलेला लॉकडाउन 15 तारखेनंतर 100 टक्के शिथिल होईल, असे कुणी समजू नये, असे राज्याच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. लॉकडाउनसंदर्भात मुख्यमं‍त्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्‍यमंत्री अजित पवार हे निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.

देशभरात, तसेच राज्यात लॉकडाउन लागू केला आहे. या कालावधीत नागरिकांना विनाकारण घराबाहेर जाण्यास मनाई आहे. विनाकारण घराबाहेर पडणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. लॉकडाउनसंदर्भात केंद्र किंवा राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असताना, टोपे यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

15 तारखेनंतर लॉकडाउन हे 100 टक्के शिथिल होईल, असे कुणी समजू नये. अनेक देशांतील परिस्थितीचा अभ्यास करून लॉकडाउन कसे शिथिल करता येईल यावर अभ्यास सुरू आहे.

केंद्र सरकार याबाबत आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत आहे, असेही टोपे म्हणाले. राज्यात 10 ते 15 एप्रिलर्पंत असलेल्या   परिस्थितीवर लॉकडाउनची पुढील दिशा अवलंबून असेल, असेही त्यांनी   सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दोन वर्षांपूर्वी यामुळे विराट झाला शाकाहारी