Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता गर्भवती महिलांनाही कोरोनाची लस मिळेल,अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली

आता गर्भवती महिलांनाही कोरोनाची लस मिळेल,अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली
, शुक्रवार, 2 जुलै 2021 (23:04 IST)
आता देशातील गर्भवती महिलांनाही कोरोनाविरूद्ध लस देण्यात येणार आहे. केंद्र सरकारतर्फे लसीकरणासाठी गठित नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायझरी ग्रुप (एनटीएजीआय) च्या शिफारशीनुसार आरोग्य मंत्रालयाने गर्भवती महिलांना लसीकरण करण्यासही मान्यता दिली आहे.मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की गर्भवती महिला आता कोविनवर नोंदणी केल्यानंतर किंवा थेट कोरोना लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरण करू शकतात.
 
 
नुकतेच आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी म्हटले होते की एनटीएजीआयच्या सूचनेनुसार गर्भवती महिलांसाठी लसीकरण सुरक्षित आहे. दरम्यान, शुक्रवारपर्यंत देशात 34 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, देशात कोविड -19 लसच्या 34 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. मंत्रालयाने माहिती दिली की सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 18-44 वयोगटातील एकूण 9,41,0,985 लोकांना लसचा पहिला डोस मिळाला आहे आणि 22,73,477.लोकांना दुसरा डोस मिळाला आहे. 
 
 
शुक्रवारी सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार 34,00,76,232 डोस देण्यात आले असून गेल्या 24 तासांत 42 लाखाहून अधिक डोस देण्यात आल्याचे मंत्रालयाने सांगितले. 
 
आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की लसीकरण मोहिमेच्या 167 व्या दिवशी 1 जुलै ला 42,64,123डोस दिले गेले, त्यापैकी 32,80,998 लोकांना पहिला डोस तर.9,83,125 लोकांना दुसरा डोस मिळाला. 
     
गुरुवारी,18-44 वयोगटातील 24,51,539 लोकांना लसचा पहिला डोस मिळाला आणि 89,027 लोकांनी दुसराडोसघेतला,असेमंत्रालयानेसांगितले.“उत्तरप्रदेश,मध्यप्रदेश,राजस्थान,तामिळनाडू,बिहार,गुजरात,कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांत 18 ते 44 वयोगटातील 50 लाखाहून अधिक डोस देण्यात आले,”असे मंत्रालयाने सांगितले. 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोबाईलवर खेळण्यासाठी रागवल्यामुळे मुलाने वडिलांवर चाकूनं जीवघेणा हल्ला