कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी तबलिगी जमातीच्या परदेशी सदस्यांवर कारवाई केली आहे. कोरोनाचा क्वारंटाईन कालावधी पुर्ण केलेल्या या लोकांचे पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत. हे तेच लोक आहेत जे निझामुद्दीन मरकजच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
दिल्ली सरकारने मागील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले होते की क्वारंटाईनचा कालावधी पुर्ण झालेल्या तबलिगी जमातीच्या 2,446 सदस्यांना घरी सोडून द्या. मात्र यातील परदेशी नागरिकांना पोलिसांकडे सोपविण्यात आले.एका अधिकाऱ्याने सांगितले की या परदेशी जमातींना व्हिसा उल्लंघन सारख्या प्रकरणात पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे कागदपत्रे जप्त केल्याने हे नागरिक देश सोडू शकत नाहीत. कोणते षडयंत्र करण्यासाठी तर यांना थांबविण्यात आले नव्हते ना, याची चौकशी केली जाणार आहे.