पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत पुकारण्यात आलेला लॉकडाउन न वाढवण्याचे संकेत दिले आहेत. लॉकडाउनच्या काळातले निर्बंध सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे असे तंनी म्हटले आहे. तसेच लॉकडाउन संपल्यानंतर आवश्यक धोरणे आखणे गरजेचे आहे असेही मोदी यांनी स्पष्ट केले. लॉकडाउन संपल्यानंतर दहा मुख्य निर्णयासह तयार राहा असे मदींनी मंत्र्यांना म्हटले आहे.
लॉकडाउन आणखी वाढणार की संपणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. कारण लॉकडाउनुळे अवघा देश ठप्प झाला आहे. हातावरचे पोट असलेले हजारो कामगार रस्त्यावर आले आहेत. त्यांच्यासाठी सरकार उपायोजना करते आहे. मात्र तरीही लॉकडाउन संपणार की नाही हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.