शिर्डी साईबाबा संस्थानने करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५१ कोटी रुपये दिले आहेत. राज्यावर करोनाचं संकट आहे. महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर देशात लॉकडाउन आहे. त्यामुळेच शिर्डी साईबाबा संस्थानने ५१ कोटींची मदत राज्य सरकारला केली आहे. महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या १२५ वर गेली आहे तर देशभरात ७०० वर ही संख्या जाऊन पोहचली आहे. देशाचा विचार केला तर सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. या पार्श्वभूमीवरच शिर्डी संस्थानने ही मदत राज्या सरकारला केली आहे.