Publish Date: Sun, 29 Mar 2020 (12:48 IST)
Updated Date: Sun, 29 Mar 2020 (12:54 IST)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले यामुळे मी देशवासियांची माफी मागतो. परंतु कठोर निर्णय घेणं ही, सध्या काळाची गरज आहे.’
दरम्यान, भारतात आतापर्यंत कोरोना बाधितांचा आकडा एक हजारांवर पोहोचला आहे. तर देशात कोरोनामुळे 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात असून महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे.