Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Symptoms of corona : कसे ओळखाल कोरोनाचे लक्षण, बचाव हाच उपाय आहे

Symptoms of corona : कसे ओळखाल कोरोनाचे लक्षण, बचाव हाच उपाय आहे

वृजेन्द्रसिंह झाला

, शनिवार, 21 मार्च 2020 (18:06 IST)
इंदूर- कोरोना व्हायरस (Corona Virus) Covid-19 च्या भीतीमुळे संपूर्ण जगाला हादरा बसला आहे. चीनहून सुरू झालेल्या या व्हायरसमुळे पूर्ण जगात मृत्यूचा आकडा 11 हजाराहून अधिक झाला असून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोनावर अजूनही कुठलाही उपचार नाही.
 
या घातक व्हायरसहून सावधगिरीने बचाव करता येऊ शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राष्ट्राला संबोधित करत देशवासीयांना आवाहन केले आहे की अधिक बाहेर पडण्याची गरज नाही. अधिक गरज पडल्यासच रुग्णालयात पोहचावे तेथे अनावश्यक गर्दी वाढवू नाही. अशात आपण लहान उपचार अमलात आणून स्वयं लक्षण ओळखावे. 
 
कोरोनोबद्दल जेव्हा आम्ही इंदूरच्या शासकीय अष्टांग आयुर्वेदिक महाविद्यालय आणि चिकित्सालयाच्या अॅसोसिएट प्रोफेसर डॉ. धर्मेन्द्र शर्मा यांच्याशी चर्चा केली तर कोरोना व्हायरस आमच्या लंग्स आणि श्वसन तंत्रावर सर्वात अधिक प्रभाव टाकतं. याच्या प्रभावामुळे यामुळे श्वासोच्छ्वासाचा त्रास होतो.
 
जेव्हा एखाद्याला सर्दी, नाकातून पाणी वाहणे, ताप, डोळ्यातून पाणी येणे, अंगदुखी, खोकला यासह श्वास घेण्यात त्रास होत असल्यास ही लक्षणे चेतावणी म्हणून घ्यावीत आणि लगेच चिकित्सकाचा सल्ला घेतला पाहिजे. आणि विशेष म्हणजे घाबरू नये.
 
त्यांनी सांगितले की रोग प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) वाढवण्यासाठी लहान-लहान घरगुती उपचारांसह आयुर्वेदिक औषधे देखील आहेत. याचे सेवन करता येऊ शकतं. त्रिकुटा चूर्ण, लवंगा, काळीमिरं, तुळस इतर वस्तू वापरता येऊ शकतात. सोबतच आपल्या पार्टनरमध्ये ही लक्षणे दिसल्यास या दरम्यान त्यांच्यापासून अंतर ठेवावं कारण अत्यधिक निकटता प्राणघातक ठरू शकते. (अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा)

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिंगल मदरने आर्थिक नियोजन कसे करावे?