Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिलासादायक : राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्ण निदान कमी झाले

दिलासादायक : राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्ण निदान कमी झाले
, मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (08:38 IST)
राज्यात कोरोनाची दुसरी लाट येईल या भीतीने आरोग्य विभागासह पालिका प्रशासनाने सर्व स्तरावर तयारी केली आहे. दुसरीकडे राज्यातील दैनंदिन रुग्ण निदान कमी झाल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. 
 
राज्यात सोमवारी ३ हजार ८३७ इतक्या रुग्णांचे निदान झाले असून  ८० मृत्यू झाले आहेत. मागच्या काही महिन्यांत दिवसभरात १०- १२ हजार रुग्ण आढळत होते.  सकारात्मक बाब म्हणजे राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख नियंत्रणात असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी, २९ नोव्हेंबर रोजी ५ हजार ५४४, २८ नोव्हेंबरला ५ हजार ९६५ आणि २७ नोव्हेंबरला ६ हजार ४०६ इतके रुग्ण आढळले होते. 
 
राज्यात बाधितांची एकूण संख्या १८ लाख २३ हजार ८९६ झाली असून मृतांची संख्या ४७ हजार १५१ वर पोहोचली आहे. राज्यात ९० हजार ५५७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी ४ हजार १९६ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १६ लाख ८५ हजार १२२ रुग्ण बरे झाले आहेत.  सध्या राज्यात ५ लाख ३५ हजार ५३० व्यक्ती घरगुती अलगीकऱणात असून ६ हजार ३५४ व्यक्ती संस्थात्मक अलगीकऱणात आहेत. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८ लाख ५६ हजार ३८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.०८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
 
मुंबई १९, नवी मुंबई ४, कल्याण डोंबिवली २, भिवंडी निजामपूर १, नाशिक ४, नाशिक मनपा ३, मालेगाव १, जळगाव ३, जळगाव मनपा ३, पुणे २, पुणे मनपा १, पिंपरी चिंचवड मनपा १, सोलापूर ५, सातारा १, रत्नागिरी २, जालना १, हिंगोली २, उस्मानाबाद १, बीड ३, बुलढाणा १, नागपूर ३, नागपूर मनपा ४, चंद्रपूर ७, चंद्रपूर मनपा ४ , गडचिरोली १ आणि अन्य राज्य व देशातील एक रुग्णांचा समावेश आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

India vs Australia: विराट कोहलीने सर्वात वेगवान 22 हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या, सचिनचा आणखी एक विक्रम मोडला