Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझर टनेलची निर्मिती

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझर टनेलची निर्मिती
, बुधवार, 8 एप्रिल 2020 (11:05 IST)
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी (रेल्वे स्टेशन, बस स्थानक, भाजीपाला मार्केट,शासकीय कार्यालय, विद्यापीठ, हॉस्पिटल प्रवेशद्वार) अशा गर्दीच्या ठिकाणी टनल सॅनिटायझरची उभारणी करून निर्जंतुकीकरण गरजेचे आहे. त्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने पुढाकार घेऊन सॅनिटायझर टनेलची निर्मिती केली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली.
 
देशातील विविध भागांमध्ये अशा प्रकारच्या टनेलचा वापर केला जातोय. ज्यामध्ये दिल्ली, हरियाना, कर्नाटक, तमिळनाडू राज्यांचा समावेश आहे. तसेच भारतीय रेल्वेकडून हरियाना येथे अशा प्रकारच्या टनेलची निर्मिती करण्यात आलेली आहे. या टनेलला फुमिगेशन टनेल असे म्हटले जाते. कर्नाटकातील हुबळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा याच उपयोग केला जात आहे.
 
डब्ल्यूएचओच्या व्यावसायिक मार्गदर्शक सूचनेनुसार इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या पुढाकाराने या टनलची निर्मिती केली आहे
 
यामध्ये पाण्यात 1% सोडियम हायपोक्लोराईडच्या मिश्रणाचा वापर केला जातो. टनेल मधून जाण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला 4 ते 5 सेकंदाची वेळ लागते. ज्या माध्यमातून निर्जंतुकीकरण केले जाते. अशा प्रकारच्या टनेलच्या निर्मितीसाठी 12 फुट लांबीच्या पोर्टा केबीनचा वापर केला गेला आहे.
 
नोजलद्वारे निर्माण होणाऱ्या धुक्यांचे अधिक चांगले वितरण सुनिश्चित करण्यासाठी फ्लूड फ्लो सिस्टम अँनसिस(ANSYS) या कार्यक्षम सॉफ्टवेअरमध्ये डिझाइन आणि सिम्युलेट केले गेले आहे. द्रवपदार्थ प्रमाणे दोन फ्लूड प्रणालीच्या पद्धतीचा वापर येथे केला आहे. डिस्क्रिट पार्टिक्युलेट मॉडेल (डीपीएम) चा उपयोग सीएफडी मॉडेलमधे वापरून द्रवपदार्थ कसा सर्व ठीकाणी कसा पोचला जाईल  हे बघितलं आहे. मानवी शरीरावर याचा प्रत्यक्षात काही विपरीत परिणाम होतो आहे का नाही याचा शोध घेण्यासाठी हि पद्धत वापरली जात आहे.
 
अशा प्रकारे कोरोनाशी लढा देण्यासाठी कमी खर्चात या अभिनव उपकरणांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामुळे कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखला जाणे शक्य होईल, पण ज्या लोकांना काही अलर्जी आहे, त्यांनी यामध्ये प्रवेशास करणे योग्य राहणार नाही असे ही श्री. सामंत यांनी सांगितले.
 
या टनलनिर्मिती साठी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू प्रा.अनिरुद्ध पंडित, शिवाजी विद्यापीठातील पदार्थ विज्ञान विभागाचे प्राध्यापक राजेंद्र सोनकवडे प्रा. सचिन मठपती व त्यांचे विद्यार्थी विक्रम कोरपाले आणि यांनी यासाठी  संशोधन करून ह्या उपकरणाचे डिझाईन केले आहे. या अभिनव उपक्रमाबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत यांनी या प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचे कौतुक करून अभिनंदन केले आणि पुढील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आए मिलकर दिया जलाए