रा
ज्यात सोमवारी तब्बल 58 हजार 924 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 351 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून होणा-या रुग्णवाढीच्या तुलनेत रुग्णवाढ काहीशी दिलासादायक आहे. राज्यात दहा हजार रुग्णांची घट झाली आहे.
आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 38 लाख 98 हजार 262 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 31 लाख 59 हजार 240 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 52 हजार 412 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.04 टक्के एवढं झाले आहे.
चिंताजनक बाब म्हणजे राज्यात सध्या 6 लाख 76 हजार 520 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात आहेत. 351 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आतापर्यत एकूण 60 हजार 824 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.58 टक्के एवढा आहे.
सध्या राज्यात 37 लाख 43 हजार 968 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 27 हजार 081 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 40 लाख 75 हजार 811 नमूने तपासण्यात आले आहेत. पुण्यात सध्या सर्वाधिक 1 लाख 25 हजार 96 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.