Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सामान्य प्रवाशांसाठी आता विशेष गाड्या धावणार

सामान्य प्रवाशांसाठी आता विशेष गाड्या धावणार
, शुक्रवार, 22 मे 2020 (16:10 IST)
सामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या १ जून पासून चालविणार असल्याचे सांगितले आहे. १ जून पासून चालविण्यात येणाऱ्या श्रमिक विशेष ट्रेन आणि २२ जून पासून विशेष वातानुकूलित गाड्या चालविण्याव्यतिरिक्त या विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.
 
विशेष रेल्वेची यादी –
१. लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर
स्थानक – लोकमान्य टिळक टर्मिनस
 
२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – भुवनेश्वर
स्थानक – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
 
३. लोकमान्य टिळक टर्मिनस – दरभंगा विशेष
स्थानक – लोकमान्य टिळक टर्मिनस
 
४. लोकमान्य टिळक टर्मिनस – वाराणसी विशेष
स्थानक – लोकमान्य टिळक टर्मिनस
 
५. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वाराणसी विशेष
स्थानक – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
 
६. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गदग
स्थानक – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
 
७. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बेंगलुरू विशेष
स्थानक – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
 
८. लोकमान्य टिळक टर्मिनस – पाटलीपुत्र जं. विशेष
स्थानक – लोकमान्य टिळक टर्मिनस
 
९. पुणे – दानापूर विशेष
स्थानक – पुणे
 
वरील सर्व विशेष गाड्यांचे बुकिंग आयआरसीटीसी वेबसाइट www.irctc.co.in आणि मोबाइल अ‍ॅपद्वारे जास्तीत जास्त ३० दिवसांच्या एआरपी (आगाऊ आरक्षण कालावधी) नुसार ऑनलाईन सुरू आहे. तसेच कोणत्याही रेल्वे स्थानकावरील आरक्षण काऊंटरवर तिकिटे आरक्षित केली जाणार नाहीत. ‘एजंट’, (आयआरसीटीसी एजंट आणि रेल्वे एजंट दोघे) यांच्यामार्फत तिकिट बुक करण्यास परवानगी नाही.
 
या वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित दोन्ही वर्ग असलेल्या विशेष गाड्या पूर्णपणे राखीव गाड्या असतील. सामान्य द्वितीय श्रेणी (जीएस) डब्ब्यातही बसण्यासाठी राखीव जागा असेल. भाडे सामान्य असेल आणि सामान्य द्वितीय श्रेणी (जीएस) डब्ब्यांसाठी राखीव असल्यास, द्वितीय आसन (२ एस) श्रेणीचे भाडे आकारले जाईल आणि सर्व प्रवाशांना जागा देण्यात येईल. अस्तित्त्वात असलेल्या नियमांनुसार RAC आणि प्रतीक्षा यादी तयार केली जाईल, परंतु प्रतिक्षा यादीतील तिकीट धारकांना ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नजिकच्या काळात करोनाची लस मिळेलचं याची शाश्वती नाही