Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यातील कंटेन्मेंट झोन 17 मे पर्यंत पूर्णपणे बंद

पुण्यातील कंटेन्मेंट झोन 17 मे पर्यंत पूर्णपणे बंद
पुणे , सोमवार, 11 मे 2020 (12:37 IST)
पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून प्रशासनाने आता लॉकडाउनच्या नियमांती कठोर अंलबजावणी सुरू केली आहे. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये (कंटेन्मेंट झोन) दवाखाने वगळता भाजीपाला, किराणा माल व इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 17 मे पर्यंत पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.
 
कंटेन्मेंट झोन बंद ठेवण्याचा निर्णय हा सोमवारी 11 मे म्हणजे आजपासून लागू होईल. या काळात दूध आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा महापालिका आणि पोलीस संयुक्तपणे करणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. दरम्यान, लॉकडाउनमध्ये शहरात एकटे राहणार्याण ज्येष्ठ नागरिकांना त्वरित मदत मिळावी म्हणून पुणे पोलिसांच्या ज्येष्ठ नागरिक कक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत ज्येष्ठ नागरिक कक्षाकडून शहरातील 11 हजार 200 ज्येष्ठ नागरिकांबरोबर वैयक्तिक पातळीवर संपर्क करून त्यांची विचारपूस करण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येत असून त्यांना जीवनावश्क वस्तू, घरपोच डबा, औषधे पोहचविण्यात येत आहेत.
 
पुणे शहर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढून 2 हजार 766 वर गेली आहे. तर मृत्यूचा आकडा 155 झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एअर इंडियाचे पाच पायलट करोनाच्या जाळ्यात