Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 13 April 2025
webdunia

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४० लाख २७ हजार ८२७वर

number of corona victims
, गुरूवार, 22 एप्रिल 2021 (08:23 IST)
राज्यात बुधवारी ६७ हजार ४६८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५६८ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ४० लाख २७ हजार ८२७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६१ हजार ९११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज ५४ हजार ९८५ रुग्ण बरे होऊन घरी असून आतापर्यंत एकूण ३२ लाख ६८ हजार ४४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.१५ एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५४ टक्के एवढा आहे.
 
नोंद झालेल्या एकूण ५६८ मृत्यूंपैकी ३०३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १६० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १०५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १०५ मृत्यू, रायगड- २०, औरंगाबाद- १५, बुलढाणा- १०, नाशिक- ९, भंडारा- ८, पुणे- ७, ठाणे- ७, कोल्हापूर- ५, परभणी- ५, अहमदनगर- ३, चंद्रपूर- ३, नागपूर- ३, जळगाव- २, नांदेड- २, सातारा- २, बीड- १, नंदुरबार- १, सांगली- १ आणि सिंधुदुर्ग- १ असे आहेत.
 
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ४६ लाख १४ हजार ४८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४० लाख २७ हजार ८२७ (१६.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९ लाख १५ हजार २९२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८ हजार ३८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच सध्या ६ लाख ९५ हजार ७४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कर्नाटक- महाराष्ट्र सीमा बंद, निपाणी पोलिसांची नाकाबंदी