Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ५५ टक्क्यांवर कायम

राज्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ५५ टक्क्यांवर कायम
, मंगळवार, 14 जुलै 2020 (08:57 IST)
राज्यात सोमवारी ४१८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४४ हजार ५०७ झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या ६४२९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ५ हजार ६३७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
पाठविण्यात आलेल्या १३ लाख ४२ हजार ७९२ नमुन्यांपैकी २ लाख ६० हजार ९२४ नमुने पॉझिटिव्ह (१९.४३ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८७ हजार ३५३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४१ हजार ६६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात १९३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२ टक्के एवढा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणेकर जाणून घ्या पुणे महापालिकेकडून लॉकडाऊनच्या नियमावलीत सुधारित नीयमावली