Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणेकर जाणून घ्या पुणे महापालिकेकडून लॉकडाऊनच्या नियमावलीत सुधारित नीयमावली

पुणेकर जाणून घ्या पुणे महापालिकेकडून लॉकडाऊनच्या नियमावलीत सुधारित नीयमावली
, मंगळवार, 14 जुलै 2020 (08:53 IST)
पुणे शहरामध्ये कोरोना बाधित रुगणांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शहरामध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
सोमवार मध्यरात्रीपासून सुरु होणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आदेश काढले आहेत.
असे आहेत लॉकडाऊनमधील नियम
 
1. पेट्रोल पंप व गॅसपंप सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरु राहणार असून ते केवळ शासकीय वाहने व अत्यावश्यक सेवेतील व पुरवठा साखळीतील वाहनांना इंधन पुरवठा करु शकतील.
 
2. सर्व राष्ट्रीयकृत व आरबीआयने मान्यता दिलेल्या बाँका नियमानुसार किमान मनुष्यबळासह सुरु राहतील. बंकेच्या इतर ग्राहकसेवा जसे ऑनलाईन, एटीएम, विमा कंपन्या यांच्या सेवा सुरु राहतील
 
3. कंपन्या सुरु राहणार असून कामगारांना स्वत:च्या वाहनाने ये-जा करता येणार आहे. मात्र, त्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना पास देऊन त्यांची माहिती पोलीस ठाण्यांना द्यायची आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. कामगारांना कामावर जाण्यासाठी कंपनीतील मुष्यबळ विभागाकडून (एचआर) पत्र घ्यावे लागणार आहे. तसेच कंपनीचे ओळपत्र जवळ बाळगावे लागेल. पोलिसांनी अडवल्यास पास आणि कंपनीचे ओळखपत्र दाखवावे लागेल.
 
4. आयटी उद्योगामध्ये 15 टक्के कर्मचारी क्षमतेसह सुरु ठेवता येणार आहे. शक्य असल्यास कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. मात्र, आयटी कर्मचाऱ्यांसुद्धा कंपनीने दिलेला पास व ओळखपत्र जवळ बाळगावे लागेल. पोलिसांनी अडवल्यास त्यांना ते दाखवून पुढील प्रवास करावा लागणार आहे. लॉकडाऊन कालावधीत कंपनीत कामावर असलेल्या कामगाराला कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याच्या उपचारासह अन्य कामगारांच्या तपासणीचा खर्च कंपनी व्यवस्थापनाला करावा लागेल. तसेच संपूर्ण कंपनी व परिसराचे निर्जुंकीकरण करावे लागेल.
 
5. शेतमालाशी कृषी निगडीत प्रक्रिया उद्योग नियमानुसार चालु राहतील. याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अस्थापनेच्या एचआर विभाग प्रमुकांनी वाहन परवाना कंपनीच्या लेटरहेडवर द्यावा. या परवान्याची माहिती सबंधित पोलीस ठाण्याला, पोलीस आयुक्तांना सादर करावी. कामगारांनी कामावर जाताना व परत येताना प्रवासा देरम्यान पास आणि ओळखपत्र जवळ बाळगावे. दरम्यानच्या कालावधीत कोरोना रुग्ण आढळून आल्यास संबंधित युनिट बंद ठेवण्यात यावे. तसेच सर्व कामगारांची अधिकाऱ्यांची स्वखर्चाने कोविड-19 टेस्ट करून घ्यावी. युनिट परिसर निर्जंतुकीकरण करुन घ्यावे.
 
6. सर्व वैद्यकीय व्यावसायीक, परिचारीका, पॅरामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व अॅ म्बुलन्स यांना शहरांतर्गत वाहतूकीसाठी परवानगी राहिल. त्यासाठी वेगळा पास अथवा परनवानगी घेण्याची आवश्यकता नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चार दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त