जेव्हा पितामह बाणांच्या शैय्येवर निजलेले असताना श्रीकृष्णाने युधिष्ठिराला म्हटले - "भीष्म मृत्यूशैय्येवर आहे ज्यांना त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील त्यांनी विचारावे.'.
युधिष्ठिर, कृष्ण, कृप आणि पांडवांसह कुरुक्षेत्रात पोहोचतात. मृत्यू शैय्यावर निजलेल्या भीष्मांनी जे काही उपदेश दिले आहेत ते खालील प्रमाणे आहेत. भीष्माने या दरम्यान राजधर्म, मोक्ष धर्म आणि आपद्धर्माचे मौल्यवान उपदेश मोठ्या तपशीलवार दिले आहेत. या उपदेशाला ऐकून युधिष्ठिराच्या मनातून अपराध आणि पश्चात्ताप दूर झाले.
1 मनावर ताबा ठेवावे.
2 अहंकार करू नये.
3 विषयांकडे वाढणारी इच्छेला थांबवणे.
4 कडू शब्द ऐकून देखील प्रत्युत्तर न देणे.
5 मार खाऊन देखील शांत राहणे.
6 पाहुणे आणि गरजूंना आश्रय देणे.
7 दुसऱ्याची निंदानालस्ती ऐकायची नाही आणि करायची नाही.
8 नियमाने शास्त्र वाचन करणं आणि ऐकणं.
9 दिवसाला झोपू नये.
10 स्वतःचा सन्मानाची इच्छा न बाळगता इतरांचा सन्मान करणं.
11 रागाला आपल्यावर हावी होऊ देऊ नये.
12 चवीसाठी नव्हे तर आरोग्यासाठी जेवावे.
13 सत्य धर्म सर्व धर्मातील सर्वोत्तम धर्म आहे. 'सत्य' हे शाश्वत धर्म आहे. तप आणि योगाची उत्पत्ती सत्यापासूनच झालेली आहे. इतर सर्व धर्म सत्याखालीच येतात. सत्य हे ब्रह्म आहे, सत्य तप आहे, सत्यासह माणूस स्वर्गात जातो. खोटं हे अंधाराप्रमाणे असतं. ज्याचा मध्ये वावरून माणूस खाली पडतो. स्वर्गाला प्रकाश आणि नरकाला अंधार म्हटलं आहे.
14 खरं बोलणं, सर्व प्राण्यांना एकसारखे समजणं, इंद्रियांवर आपले नियंत्रण ठेवणे. ईर्ष्या, तिरस्कारापासून वाचणे, क्षमा, लज्जा, इतरांना त्रास न देणे, दुष्कर्म टाळणे, देवाची भक्ती, मनाची शुद्धता, धैर्य, विद्या - हे 13 सत्य धर्माचे लक्षणे आहेत. वेद हे सत्याचे उपदेश करतात. सहस्त्र अश्वमेघाच्या यज्ञा प्रमाणेच सत्याचे फळ आहेत.
15 अशे शब्द बोला जे दुसऱ्यांना आवडतील, दुसऱ्यांना वाईट बोलणे त्यांची निंदानालस्ती करणं, वाईट उद्गार काढणे, हे सर्व त्यागायला हवं. इतरांचा अपमान करणे, अभिमान करणे आणि गर्विष्ठपणा हे सर्व अवगुण आहेत.
16 या जगात इच्छा पूर्ण करून सुख मिळतं आणि जे सुख परलोकात मिळतं, ते या सुखाचा सोळावा अंश देखील नाही. जे आपल्या वासनांपासून मुक्त झाल्यावर मिळतं. ज्यावेळी माणूस आपल्या इच्छांवर वासनांवर आवर धरतो, जसे की एक कासव आपल्या अंगाला आत ओढतो, तेव्हाच आत्म्याचा प्रकाश आणि महत्त्व दिसतं. जो माणूस स्वतःला वश करण्यासाठी इच्छुक असतो त्याला लोभ आणि आसक्तीपासून लांबच राहावं.
17 मृत्यू आणि अमरत्व - हे दोन्ही मानवाच्या अधीन आहे. आसक्तीचे फळ म्हणजे मृत्यू आणि सत्याचे फळ अमरत्व आहे. या जगाला वृद्धावस्थेने सर्व बाजूने वेढले आहे. मृत्यू हल्ला करीतच आहे. दिवस आणि रात्र येत-जात आहे तरी ही अजून तुला जाग कशी येत नाही ? उठ वेळेला सरू देऊ नकोस. आपल्या हितासाठी काही तरी कर. आपले कर्तव्य संपत नाही की मृत्यू आपल्याला घेऊन जाते.
18 स्वतःचा इच्छेनुसार निर्धनता पत्करणे सुख असे. हे माणसासाठी फायदेशीर आहे. यामुळे माणूस संकटापासून वाचतो. जो या मार्गावर चालतो त्याचे कोणीही शत्रू बनत नाही. हा मार्ग जरीही अवघड असला तरीही चांगल्या माणसांसाठी हा सोपा आहे. ज्या माणसाचे जीवन शुद्ध आहे आणि याचा व्यतिरिक्त त्याची काही संपत्ती नाही, त्यासारखा दुसरा कोठेही अद्यापि मला दिसत नाही. मी तूळच्या एका भागावर निर्धनता ठेवली आणि दुसऱ्या भागावर राज्य ठेवले. निर्धनताच भाग मला जड दिसला. श्रीमंत माणूस नेहमीच घाबरलेला असतो, जणू मृत्यूने त्याला डांबून ठेवले आहेत.
19 त्याग केल्या शिवाय काहीही मिळत नाही. त्याग शिवाय आदर्शाची सिद्धी मिळत नाही. त्याग केल्या शिवाय माणूस भयमुक्त होत नाही. त्याग केल्याने त्याला सर्व प्रकारांचे सुख मिळतं. इच्छांचा त्याग करणं त्यांना पूर्ण करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आजतायगत कोणी आपल्या इच्छांना पूर्ण केले आहे ? या सर्व इच्छांपासून बाहेर पडावं. वस्तूंचा मोह आवरा. शांत राहा.
20 तोच माणूस सुखी आहे जो आपल्या मनाला समतोल ठेवतो. जो उगाच काळजी करीत नाही. खरं बोलतो. सांसारिक मोहात अडकत नाही, जो काही विशिष्ट काम करण्याचा प्रयत्न करत नाही. जो माणूस स्वतःला दुखी करतो तो आपला रूप, रंग, धन, जीवन आणि धर्माला नष्ट करून घेतो आणि जो माणूस शोक किंवा दुःख पासून वाचतो, त्याला सुख आणि आरोग्य मिळतं. सुख दोन प्रकारच्या माणसांना मिळतं. एक त्यांना जे सर्वात जास्त मूर्ख आहे. आणि दुसरे ते ज्यांनी बुद्धीच्या प्रकाशामध्ये घटक बघितले आहे. जे मध्ये लोंबकळणारे आहेत ते दुखी असतात.
21 सभ्य आणि श्रेष्ठ माणसाचे लक्षण आहे की ते दुसऱ्यांचा श्रीमंती बघून हेवा करीत नाही. तो विद्वानांचा आतिथ्य करतो आणि धर्मासाठीचे उपदेश ऐकतो. जो माणूस आपल्या भविष्यावर आधिपत्य ठेवतो (आपला मार्ग स्वतः निवडतो दुसऱ्यांचा हाताची भावली बनत नाही) जो वेळेनुसार विचार करतो आणि त्याला आत्मसात करतो तो माणूस सुख मिळवतो. आळस माणसाचा नाश करतो.
22 एकटेच जेवू नका. पैसे मिळवायचे असल्यास कोणाची साथ घ्या. प्रवास देखील एकटे करू नये. जेथे सर्व झोपलेले असतात तेथे एकटेच जगू नये.
23 दम किंवा शक्तीसारखा कोणता धर्म ऐकलेच नाही. दम काय आहे ? क्षमा, धृती, वैर - त्याग, समता, सत्य, साधेपणा, इंद्रिय संयम. सक्रिय राहणे, सौम्य स्वभाव, लज्जा, आनंदी राहणे, समाधानी, मजबूत वर्ण गोड बोलणे, कोणालाही दुखी न करणं, हेवा न करणं, हे सर्व दम किंवा शक्तीमध्ये समाविष्ट आहे.