Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनाच्या काळात हॅन्डशॅक ला नमस्कार : नमस्कार आणि नमस्तेमधील अंतर समजून घ्या

कोरोनाच्या काळात हॅन्डशॅक ला नमस्कार : नमस्कार आणि नमस्तेमधील अंतर समजून घ्या
, बुधवार, 1 जुलै 2020 (17:05 IST)
प्राणी, पक्षी, पूर्वज, दानव आणि देवतांच्या जीवनाच्या पद्धतीचे काही नियम असतात. पण मानवाच्या अनियमित जीवनशैलीमुळे तो धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पासून लांब चालला आहे. आजारपण आणि शोकमध्ये गुंतून तो या जगाला निरोप देतो. किंवा जगाला खराब करण्यास तो जवाबदार असतो. कोरोनाने पूर्ण जगाला भारताचे अभिवादन संस्कार अवलंब करण्यास भाग पाडले आहेत. सनातन धर्मात प्रत्येक कृती नियमांशी बांधलेली आहे आणि हे नियम असे आहेत ज्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकाराचं बंधन वाटतच नाही, तर हे नियम आपल्याला यशस्वी आणि निरोगीच करतात.
 
 ।।कराग्रे वस्ते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती।
 कर पृष्ठे स्थितो ब्रह्मा, प्रभाते कर दर्शनम्‌॥
 
सकाळी आपण झोपून उठल्यावर सर्वात आधी अंथरुणावर बसूनच आपले तळहात उघडून त्यांना आपसात जोडून त्यांचा रेषांना बघून ह्या मंत्राचे एकदा मनातल्या मनात स्मरण करून आणि मग हातांना चेहऱ्यावरून फिरवतात. नंतर जमिनीला नमस्कार करून उजवा पाय पुढे टाकतात मग शौचापासून निवृत्त होऊन पाच मिनिटे ध्यान किंवा संध्या करतात.
 
संध्या : 
शास्त्र म्हणतात की संध्या केल्यांनतरच कुठले ही काम केले जातात. संध्या वंदनाला संध्योपासना असे ही म्हणतात. संध्याकाळी संध्या करतात. संधीकाळातच संध्या करतात. संधी ही विशेषतः 5 वेळाची असते. पण सकाळ आणि संध्याकाळच्या संध्येचे महत्त्व जास्त आहे. म्हणजे सूर्योदयाच्या वेळेची आणि सूर्यास्त वेळेची. यावेळी देऊळात किंवा एकांतात शौच, स्नान, आचमन, प्राणायामाशी निवृत्त होऊन गायत्री श्लोकासह निराकार देवाची प्रार्थना केली जाते. 
 
घरातून बाहेर पडताना : 
घरातून बाहेर पडण्याचा पूर्वी आपल्या आई वडिलांचे पाय पडतात. नंतर उजवा पाय बाहेर काढून आपल्या यशस्वी प्रवासाची इच्छा देवाच्या पुढे करतात.
 
नमस्कार आणि नमस्ते :
काही लोकं राम -राम, गुड मॉर्निंग, जय श्रीकृष्ण, जय गुरु, हरी ओम, साईराम किंवा इतर शुभेच्छा देऊन अभिवादन करतात. पण संस्कृत शब्द नमस्कार भेटीच्या वेळी आणि नमस्ते निघताना म्हणतात. पण काही लोकं याचा उलट करतात. काही विद्वान असेही मानतात की नमस्कार सूर्योदयाच्या नंतर आणि 
 
नमस्ते हे सूर्यास्तानंतर करतात. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत हिंदूंनी आपापल्या अभिवादन करण्याचा स्वतःच्या पद्धती काढल्या आहेत. जे बरोबर आहे की चूक हे माहीत नाही. 
 
त्याच प्रमाणे काही लोकं नमश्कार म्हणतात. ते देखील अशुद्ध आहे. बरोबर शब्द नमस्कार आहे. 
 
कोरोनाच्या काळात सर्व लोकं हात मिळवण्यावाचून घाबरतात त्यामुळे आता सर्व नमस्तेचं महत्त्व समजू लागले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुरुपौर्णिमा 2020 तिथी, मुहूर्त आणि महत्त्व