Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झूम अॅपला देशी पर्याय आला, Say Namaste लाँच

झूम अॅपला देशी पर्याय आला, Say Namaste लाँच
, बुधवार, 10 जून 2020 (20:29 IST)
झूम अॅपला टक्कर देण्यासाठी देशी व्हिडिओ अॅप Say Namaste लाँच झाला आहे. अँड्रॉइड फोन युजर्ससाठी या अॅप Google Play Store उपलब्ध आहे. आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांनी हा नवीन अॅप डाऊनलोड केला आहे.
 
या अॅपमधील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये युजर्सह इतर ५० लोक सामील होऊ शकतात.  या अॅपमध्ये युजर्सला स्क्रीन शेअरिंग, टेक्स्ट मोड आणि फाईल शेअरिंगसारखी खास सुविधा दिली आहे. याशिवाय युजर्स स्क्रीन शेअरिंग ऑप्शनच्या मदतीने त्यांच्या डिव्हाइसची स्क्रीन इतर युजर्सला शेअर करू शकतो. हे फिचर मिटिंग दरम्यान प्रेझेंटेशनसाठी उपयुक्त ठरेल.
 
Say Namaste अॅपमध्ये युजर्सला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगगदरम्यान टेक्स्ट मेसेज करायला मिळले. म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये टेक्स्ट मेसेजद्वारे देखील बोलू शकता. या अॅपमध्ये डॉक्युमेंट, पीडीएफ, फोटो आणि व्हिडिओ फाईल इत्यादी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान शेअर करू शकता. Play Store वर या अॅपला ४.६ रेटिंग्स मिळाले आहेत. तसेच कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार हा अॅप अँड्रॉइडआणि आईओएस दोन्ही प्लेटफॉर्म डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

करोना संसर्गापासून बचावासाठी गुगल मॅप्स वर नवीन फीचर