Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चातुर्मासात काय करावं आणि काय नाही, जाणून घ्या

चातुर्मासात काय करावं आणि काय नाही, जाणून घ्या
, गुरूवार, 2 जुलै 2020 (15:40 IST)
उपवास, भक्ती आणि शुभ कार्याच्या 4 महिन्याला हिंदू धर्मात 'चातुर्मास' म्हणतात. चातुर्मासाची कालावधी 4 महिन्याची आहे. हा काळ आषाढ शुक्ल एकादशी पासून सुरु होऊन कार्तिक शुक्ल एकादशी पर्यंत मानलं गेला आहे. चातुर्मासाच्या प्रारंभास देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं आणि शेवटी 'देवोत्थान एकादशी' असं म्हणतात.
 
4 महिने अश्या प्रकाराचे आहे - श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक.
 
का करतात उपवास : ध्यान आणि साधना करणाऱ्यांना हे महिने महत्वाचे असतात. वरील या 4 महिन्यांना उपवासाचे महिने यासाठी म्हणतात कारण की या 4 महिन्यात 
 
आपली पचन शक्ती कमकुवत होते तसचं अन्न आणि पाण्यामध्ये जीवाणूंची संख्या देखील वाढते. वरील 4 महिन्यापैकी पहिला महिना तर सर्वात महत्वाचा मानला गेला आहे.
 
विशेष नियम : या दरम्यान जमिनीवर झोपणं आणि सुर्योदयाच्या पूर्वी उठणं शुभ मानतात.
उठल्यावर अंघोळ करणं आणि जास्त काळ शांत राहणं. 
दिवसातून एकदाच जेवावं. एकाच वेळी चांगले अन्न खावे.
 
निषिद्ध कार्य : या 4 महिन्यात लग्न, जातकर्म संस्कार, गृह प्रवेश, हे शुभ कार्य निषिद्ध मानले गेले आहेत. पलंगावर झोपणं, शारीरिक संबंध ठेवणे, खोटं बोलणं हे सर्व निषिद्ध आहे. 
 
पदार्थांचा त्याग करणं : या उपवासात तेलकट वस्तूंचा सेवन करू नये. दूध, साखर, दही, तेल, वांग, पालेदार भाज्या खारट किंवा चमचमीत जेवण, मिठाई, सुपारी, मांस आणि मद्य याचे सेवन करू नये. 
श्रावणामध्ये पालेभाज्या जसे पालक, भाजी इत्यादी भाद्रपदात दही, अश्विन मध्ये दूध, कार्तिकमध्ये कांदा, लसूण आणि उडदाची डाळ या पदार्थांचा त्याग करतात. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भीष्माने युधिष्ठिराला सांगितलेल्या खास गोष्टी, आपल्या आयुष्यात कामी येतील