राज्यात शुक्रवारी २१ हजार ६५६ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ४०५ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात २२ हजार ०७८ रुग्णांना मागील २४ तासांमध्ये डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची आत्तापर्यंतची संख्या ११ लाख ६७ हजार ४९६ इतकी झाली आहे. यापैकी ८ लाख ३४ हजार ४३२ रुग्णांना कोरोनामुक्त झाले आहेत. तर करोनाची लागण होऊन महाराष्ट्रात आत्तापर्यंत ३१ हजार ७९१ मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला ३ लाख ८८७ अॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात ४०५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७२ टक्के इतका आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५६ लाख ९३ हजार ३४५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११ लाख ६७ हजार ४९६ नमुने पॉझटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७ लाख ७८ हजार ७९२ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३६ हजार ७६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्या ३ लाख ८८७ अॅक्टिव्ह केसेस आहेत.