Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रयत शिक्षण संस्थेकडून दोन कोटींची मदत

Two crores
, सोमवार, 30 मार्च 2020 (16:51 IST)
करोना विषाणू संसर्गाविरोधात लढण्यासाठी सरकारला हातभार म्हणून रयत शिक्षण संस्थेकडून दोन कोटींचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला जाणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
 
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन एकत्रित करून सुमारे दोन कोटींचा निधी धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय एकमुखाने घेतला असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
 
“कोवीड-19 या जागतिक महामारीचा सामना महाराष्ट्र सरकार मोठ्या धैर्याने करत आहे. मात्र करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू केल्याने एक नवे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून रयत शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांच्या एक दिवसाच्या वेतना इतकी सुमारे दोन कोटी रुपये रक्कम धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहायत्ता निधी-कोवीड-19 मध्ये जमा करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला आहे. असं शरद पवार यांची स्वाक्षरी असलेल्या पत्राद्वारे सांगण्यात आलं  आहे.”

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यात कोरोनाचा पहिला बळी