दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात होती. त्यानुसार रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत मुंबईत हजाराच्या आत रुग्णसंख्या असताना शुक्रवारी १०३१ नव्या रुग्णांची नोंद झाली तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला.
ठाणे जिह्य़ात शुक्रवारी ६७० नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे बाधित झालेल्या एकूण रुग्णांची संख्या २ लाख २२ हजार २०२ इतकी झालेली आहे. तर दिवसभरात १४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५ हजार ५८२ इतका झाला आहे.
नव्या रुग्णांमध्ये ठाणे शहरातील १८०, कल्याण-डोंबिवली १४४, नवी मुंबई १६८, उल्हासनगर १४, भिवंडी १९, मीरा-भाईंदर ७१, अंबरनाथ २४ आणि बदलापूरमधील १७ रुग्णांचा सामावेश आहे. तसेच ठाणे ग्रामीण भागात ३३ नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे, तर ठाण्यात ४, कल्याण डोंबिवली ४, नवी मुंबई ३, उल्हासनगर १ आणि ग्रामीण भागातील दोघांचा मृत्यू झाला.
राज्यात शुक्रवारी ५६४० नवे रुग्ण आढळले असून, १५५ जणांचा मृत्यू झाला राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १७ लाख ६८ हजार झाली असून, ४६,५११ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्युदर हा २.६३ टक्के आहे. गेल्या २४ तासात ६९४५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. दिवसभरात नाशिक जिल्हा ३७७, पुणे शहर ३३५, पिंपरी-चिंचवड १६५, उर्वरित पुणे जिल्हा २४८, नागपूर शहर ३७९ नवे रुग्ण आढळले.