Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चिंताजनक बातमी ! महाराष्ट्रात डेल्टा प्लसची पुन्हा 10 नवीन प्रकरणे आढळली, आतापर्यंत 76 प्रकरणे

चिंताजनक बातमी ! महाराष्ट्रात डेल्टा प्लसची पुन्हा 10 नवीन प्रकरणे आढळली, आतापर्यंत 76 प्रकरणे
, सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (20:58 IST)
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरियंट ची 10 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात डेल्टा प्लसच्या 10 नवीन प्रकरणांसह संक्रमित लोकांची एकूण संख्या 76 वर पोहोचली आहे.10 नवीन प्रकरणांपैकी सहा कोल्हापुरात, तीन रत्नागिरीत आणि एक सिंधुदुर्गात आढळले आहेत. या 76 रुग्णांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 
 
रविवारी, महाराष्ट्रात कोरोना विषाणूची 4,797 नवीन प्रकरणे नोंदली गेली, त्यानंतर राज्यातील संक्रमित लोकांची संख्या 63,92,660 झाली. त्याचबरोबर 130 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 1,35,039 झाली आहे. आज येथे जारी करण्यात आलेल्या आरोग्य बुलेटिनमध्ये राज्य सरकारने म्हटले आहे की, दरम्यान, आणखी 3710 लोक बरे झाल्यामुळे संसर्गमुक्त लोकांची संख्या 6189,933 झाली आहे. राज्याचा रिकव्हरी दर 96.83 आहे आणि मृत्यू दर 2.1 टक्के आहे. संपूर्ण राज्यात अजूनही कोरोना विषाणूची 64219 सक्रिय प्रकरणे आहेत.
 
मुंबईत निर्बंध शिथिल झाले
मुंबईत कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर शहरातील सर्व बाग, क्रीडांगणे, चौपाटी, समुद्रकिनारे इत्यादी सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत खुले राहतील. महापालिका आयुक्त यांनी सोमवारी ही माहिती दिली. यापूर्वी यावर्षी 4 जून रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) सकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत ही ठिकाणे उघडण्याची परवानगी दिली होती. 
 
पुढील आदेश येईपर्यंत आदेश लागू राहील
बीएमसीने सांगितले की, राज्य सरकारने 11 ऑगस्ट रोजी जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे पुढील आदेशापर्यंत प्रभावी असतील. 11 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेल्या ब्रेक द चेनसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राज्य सरकारने उद्यान, मैदाने आणि समुद्रकिनारे उघडण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले होते.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धक्कादायक !अमेरिकन हवाई दलाच्या उडत्या विमानातून तीन अफगाणी लोक पडले, देश सोडण्यासाठी टायरवर बसले