Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चिंताजनक बातमी ! राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा शिरकाव, कोणता आहे 'हा ' व्हेरियंट

चिंताजनक बातमी ! राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा शिरकाव, कोणता आहे 'हा ' व्हेरियंट
, सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (13:28 IST)
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव हळू-हळू कमी होत आहे .कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही काही राज्यात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात कोरोनाच्या नवीन व्हेरियंट चा शिरकाव झाला असून काही लोकांमध्ये त्याची लक्षणे आढळून आली आहे. आता कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट AY 4.2 हा प्रकार आढळून आल्यामुळे काळजी वाढली असून मध्यप्रदेशात या व्हेरियंटची 7 लोक आढळून आली आहे. या मुळे खळबळ माजली आहे. मध्यप्रदेशाच्या पाठोपाठ आता महाराष्ट्रात देखील जवळपास 1 टक्के लोकांच्या नमुन्यांमध्ये या व्हेरियंटची लक्षणे आढळून आली आहे त्यामुळे ही राज्यासाठी  काळजी वाढवणारी  बातमी आहे.
 
सध्या सणा सुदीचे दिवस आहे , राज्यात कोरोनासाठीची लावण्यात आली निर्बंधे शिथिल करण्यात आली असून सर्व उघडण्यात आले आहे. लोकांनी बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. लोकांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सामाजिक अंतर राखणे,  मास्क लावणे, सेनेटाईझरचा वापर करणे बंधनकारक आहे. कोरोनाच्या नियमावलीचे पालन काटेकोरपणाने करण्यास प्रशासनाने सांगितले आहे. 
 
कोरोनाच्या या डेल्टा प्रकार AY 4.2 या व्हेरियंटवर संशोधन सुरु आहे या व्हेरियंटची माहिती ब्रिटनच्या आरोग्य यंत्रणाने  दिली आहे. सध्या ब्रिटनमध्ये या व्हेरियंट ने थैमान मांडला आहे. हे व्हेरियंट झपाट्याने पसरतो असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या या व्हेरियंट चे प्रकार महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात आढळल्यामुळे हे काळजी करण्यासारखे आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विराटने केली रोहितची पाठराखन, पत्रकार परिषदेत असे म्हटले ..