या रोमांचक सामन्याला बघण्यासाठी आणि त्याचा साक्षीदार बनण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी तयारी केली आहे. भारत-पाकिस्तान सामन्याचा रोमांचच असा आहे की या सामन्याचे तिकिट 50-60000 रुपयांमध्ये विक्री होत आहे.
हो, हे खरं आहे, भारत-पाक सामन्याच्या तिकिटांची किंमत आता 60 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. वर्ष 2013 नंतर दोन्ही देशांमध्ये दुरावा निर्माण झाल्यामुळे भारत आणि पाकिस्तान संघ फक्त आयसीसी आणि आशियाई क्रिकेट काउंसिल द्वारे आयोजित करण्यात येणार्या टूर्नामेंटमध्येच अमोर समोर येतात.
एवढ्या दिवसाने होणार्या सामन्यामुळे यंदा देखील प्रेक्षकांचा रोमांच आणि उत्साह वाढलेला आहे आणि म्हणूनच 26 हजार क्षमता असणारा ओल्ड ट्रैफर्ड स्टेडियममध्ये होणार्या या सामन्याचे तिकिट विंडो ओपन झाल्याबरोबरच काही तासांमध्ये विकण्यात आले.
ब्रिटनमध्ये लाखोच्या संख्येत भारतीय आणि पाकिस्तानी मूळचे लोक राहतात म्हणून तिकिट महाग होण्याचे हे देखील एक कारण आहे.
पण ज्या लोकांनी अगोदरच तिकिट खरेदी केले होते, ते लोक आता तेच तिकिट विकून फायदा मिळवत आहे. असेच लोकांकडून तिकिट घेऊन परत त्याची विक्री करणारी वेबसाइट 'वियागोगो'ने दिलेल्या वृत्तानुसार त्याच्या जवळ किमान 480 तिकिट परत विक्रीसाठी आले आहे ज्यात ब्राँझ, गोल्ड, प्लॅटिनम आणि सिल्वर स्तराचे तिकिट होते.
कंपनीच्या वेबसाइट अनुसार ब्राँझ आणि सिल्वर स्तराचे तिकिट त्याने पूर्ण विक्री केले आहे ज्याची किंमत 17 हजार रुपयांपासून तर 27 हजार रुपयांपर्यंत होती.
तसेच शुक्रवारापर्यंत 58 गोल्ड आणि 51 प्लॅटिनम स्तराचे तिकिट उपलब्ध होते, ज्याची किंमत 47 हजार रुपयांपासून 62 हजार रुपयांपर्यंत ठेवण्यात आली होती. वेबसाइट नुसार त्याच्याजवळ गोल्ड स्तराचे 58 आणि प्लॅटिनम स्तराचे 51 टिकत अजूनही उपलब्ध आहे. वेबसाइटनुसार ब्राँझ आणि सिल्वर स्तराच्या तिकिटांच्या किंमतींत 5 हजार रुपयांचे अंतर आहे कारण त्या क्षेत्रात दारूसाठी स्वीकृती आहे, त्याचीच अधिक डिमांड आहे.
रिपोर्टनुसार शुक्रवारी गोल्ड स्तराचे तिकिट किमान 4.20 लाख रुपये (6 हजार डॉलर)मध्ये विकण्यात आले.