rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विश्वचषक क्रिकेट : भारताच्या गोलंदाजीची बाजू भक्कम

India
मुंबई , मंगळवार, 21 मे 2019 (16:07 IST)
भारताचा सलामीचा माजी फलंदाज लालचंद राजपूत यांना आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या गोलंदाजीची बाजू भक्कम वाटत आहे.
 
भारताचा संघ या विश्वचषक स्पर्धेचा संभाव्य दावेदार आहे, असेही राजपूत यांना वाटते. विश्वचषक स्पर्धेत दहा संघ आहेत. या सर्व संघातील गोलंदाजीची क्षमता लक्षात घेतल्यास भारताच्या गोलंदाजीची बाजू मजबूत व सर्वोत्तम आहे. त्यामुळे भारत विजेतेपदाचा दावेदार आहे असे ते म्हणाले. 
 
भारताकडे सर्वोत्तम आक्रमण असले तरी हा संघही संतुलित आहे. या संघात चांगले अष्टपैलू खेळाडूही आहेत. इतर संघाच्या तुलनेत भारताचा संघ सरस आहे, अशी भर राजपूतने घातली. मुंबई नॉर्थ इस्ट संघाचा मेन्टॉर आहे.
 
भारताच संघाला पराभूत करणे हे फारच कठीण आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या हा जमेची बाजू आहे. रवींद्र जडेजा तळात फलंदाजी करू शकतो. 
 
भारताचा संघ उपान्त्य फेरीत नक्कीच असेल असे ते म्हणाले. राजपूत हे सध्या झिम्बाब्वे संघाचेही प्रशिक्षक आहेत.
 
भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुध्द 5 जून रोजी विश्वचषकाचा पहिला साखळी सामना खेळणार आहे. 
 
2007 साली भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत खेळली गेलेली पहिलीच टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकली. या विजेत्या संघाचे राजपूत हे क्रिकेट व्यवस्थापक होते. शिखर धवन, रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली हे टॉप तीन फलंदाज या संघात आहेत.
 
2007 च्या आणि सध्याच्या विश्वचषक संघात काय  साम्य आहे असे विचारले असता राजपूत उत्तरले की, सध्याच्या संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. एकदिवसी स्पर्धेत अष्टपैलू खेळाडूंचा वाटा महत्त्वाचा ठरतो. पहिले तीन खेळाडू आणि अष्टपैलू खेळाडू यांच्यावर भारतीय संघाचे भवितव्य अवलंबून आहे असे ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विमानात महिलेची मांडी जळाली, स्पाइडजेट ने मागितली माफी