Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विश्वचषक स्पर्धा : विजय शंकर दुखापतीमुळे संघातून बाहेर

विश्वचषक स्पर्धा : विजय शंकर दुखापतीमुळे संघातून बाहेर
, सोमवार, 1 जुलै 2019 (16:23 IST)
विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा  अष्टपैलू खेळाडू विजय शंकर दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला आहे. आधी शिखर धवन आणि नंतर विजय शंकर दुखापतीमुळे संघातून बाहेर पडल्याने भारतीय संघासमोर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विजय शंकरच्या जागी मयांक अग्रवालला बोलवण्यात आलं असल्याची माहिती आहे. नेट प्रॅक्टिस करत असताना जसप्रीत बुमरहाचा बॉल विजय शंकरच्या पायाला लागला होता. सुरुवातीला ही गंभीर दुखापत नसल्याचं सांगत विजय शंकर पुनरागमन करणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र ही दुखापत गंभीर असून विजय शंकरला विश्रांती देण्यात आली आहे. 
 
‘भारतीय संघ व्यवस्थापन मयांक अग्रवालला संधी देण्याची शक्यता आहे. मयांक अग्रवाल ओपनिंग फलंदाज असल्याने तो के एल राहुलची जागा घेऊ शकतो. जर पुढील दोन सामन्यांमध्ये ऋषभ पंत चांगली खेळी करु शकला नाही तर के एल राहुलला चौथ्या क्रमांकावर खेळवलं जाऊ शकतं’, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भुशी धरण काठोकाठ भरले