ODI विश्वचषक 2023 च्या 39 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा तीन गडी राखून पराभव केला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 291 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने सात गड्यांच्या मोबदल्यात 293 धावा केल्या आणि सामना जिंकला.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अफगाणिस्तानने 50 षटकांत 5 गडी गमावून 291 धावा केल्या. विश्वचषकाच्या इतिहासातील ही अफगाणिस्तानची सर्वोच्च धावसंख्या आहे.
ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा तीन गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह कांगारू संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्य फेरी गाठणारा ऑस्ट्रेलिया हा तिसरा संघ ठरला आहे. आता चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत 291 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने सात गड्यांच्या मोबदल्यात 293 धावा केल्या आणि सामना जिंकला.
अफगाणिस्तानकडून इब्राहिम झद्रानने सर्वाधिक नाबाद 129 धावा केल्या. राशिद खाने 35 धावांची नाबाद खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडने दोन बळी घेतले. मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झाम्पाला प्रत्येकी एक विकेट मिळाली. त्याचवेळी ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी नाबाद 201 धावा केल्या. मिचेल मार्शने 24 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानकडून नवीन उल हक, अजमतुल्ला उमरझाई आणि रशीद खान यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
ऑस्ट्रेलियाने 91 धावांत सात विकेट गमावल्या होत्या. यानंतर मॅक्सवेलने पॅट कमिन्ससोबत 202 धावांची नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. या विश्वचषकातील हे पहिलेच द्विशतक होते