Shahid Afridi:पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या बहिणीने मंगळवारी जगाचा निरोप घेतला. आफ्रिदीने आपल्या बहिणीच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. शाहिद आफ्रिदीची बहीण काही दिवसांपासून आजारी होती. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
शाहिद आफ्रिदीची बहीण बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. याचा खुलासा त्यांनीच केला होता. शाहिद आफ्रिदीने एक दिवस आधी आपल्या बहिणीबद्दल सांगितले होते की तो त्याच्या बहिणीला भेटणार आहे.
शाहिद आफ्रिदीने सोमवारी ट्विट केले होते आणि लिहिले होते की, मी लवकरच तुम्हाला भेटण्यासाठी परत येत आहे. माझे प्रेम असेच राहो. त्याने चाहत्यांना सांगितले की, माझी बहीण सध्या तिच्या आयुष्यासाठी लढत आहे. मी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो. अल्लाह त्यांना लवकरच बरे करेल. शाहिद आफ्रिदीच्या या ट्विटनंतर काही तासांनी त्यांच्या बहिणीच्या मृत्यूची बातमीही समोर आली.
शाहिद आफ्रिदीने बहिणीच्या मृत्यूनंतर आणखी एक ट्विट केले. मंगळवार, 17 ऑक्टोबर रोजी शाहिद आफ्रिदीने लिहिले की आम्ही सर्व अल्लाहचे सेवक आहोत आणि त्याच्याकडे परत जाऊ. जड अंतःकरणाने आम्ही तुम्हाला कळवत आहोत की आमच्या लाडक्या बहिणीचे निधन झाले आहे.
शाहिद आफ्रिदीच्या या पोस्टनंतर आफ्रिदीच्या बहिणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी क्रिकेट चाहते सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.