Virar: शारदीय नवरात्रोत्सवाला 15 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. देवीच्या मंदिरात नवरात्रानिमित्त तुफान गर्दी असते. देवीच्या दर्शनासाठी सकाळ पासूनच लोकांची रांग असते. विरारच्या जीवदानी मंदिराच्या गडावर संध्याकाळी चढताना एका भाविकांचा हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची घटना घडली आहे.
देविदास भवरलाल माळी असे या मयत भाविकांचं नाव असून ते अंधेरीच्या गुलमोहर रोडच्या डुगरे चाळीत राहत होते. देविदास हे आपल्या मित्रासह रविवारी संध्याकाळी विरारच्या जीवदानी देवीच्या दर्शनासाठी आले असता. गड चढताना त्यांनी गणपतीच्या मंदिराचे दर्शन घेऊन पायऱ्या चढण्यास सुरु केले.
गडाच्या मध्यावर आल्यावर त्यांना अस्वस्थता जाणवली आणि अचानक त्यांच्या छातीत दुखु लागले. ते बेशुद्ध झाले. त्यांना तिथूनच तातडीनं इतर भाविकांच्या मदतीनं रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचे मृतदेह शवविच्छेदना नंतर त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आले. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.