दत्त संप्रदायाला भक्तांच्या हृदयात विशेष स्थान आहे आणि त्याच्याशी संबंधित दैवी अवतार अत्यंत भक्तीने पूजनीय आहेत. या आदरणीय आध्यात्मिक अवतारांचे आवडते पदार्थ अर्पण करणे ही एक पवित्र परंपरा मानली जाते. आज आम्ही महाराष्ट्रातील काही महान गुरुंचे आवडते पदार्थ सांगत आहोत. ज्यांचा नैवेद्य दाखवून आपण प्रसाद ग्रहण करुन धन्य होऊ शकता.
भगवान श्री दत्तात्रेय : श्री दत्तात्रेय महाराजांना केसरी गोड भात, केसरी दूध, घेवड्याची भाजी, शिरा, केसरी पेडा आणि सुंठवडा याचा नैवेद्य दाखवला जातो.
श्रीपाद श्रीवल्लभ: तांदळाची खीर, गव्हाच्या पिठाचा शिरा, दुध भात, मोदक, आणि राजगिरा भाजी.
नृसिंह सरस्वती स्वामी महाराज: घेवड्याची शेंगा भाजी आणि गोड भात.
श्री स्वामी समर्थ महाराज: पुरणपोळी, बेसनाचे लाडू, कडबोळी, कांदा भजी, गव्हाची खीर आणि चहा
शिरडीचे साईबाबा: पापडी वालाची भाजी आणि मुगाची खिचडी.
शेगावचे गजानन महाराज: पिठलं-भाकरी, मिरचीचा ठेचा आणि कांदा.
सद्गुरु श्री शंकर महाराज: मिश्र डाळीची खिचडी, कांदा भजी, चहा, शेवयाची खीर.
सद्गुरु श्री चिले महाराज: वडा पाव, तळलेली मिरची, मोदक.
सद्गुरु साटम महाराज: कांद्याची भजी.