Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध यंत्रांची उपासना करा

लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध यंत्रांची उपासना करा

वेबदुनिया

श्री अष्टलक्ष्मी यंत्र : या यंत्राची स्थापना दिवाळीच्या रात्री पांढऱ्या कागदात किंवा भोजपत्रावर अष्टगंधाने करावी. या यंत्राच्या मध्यावर एक त्रिकोण
स्थापित केला जातो. या यंत्राला दक्षिणावर्ती शंखाच्या समोर ठेवून लक्ष्मी मंत्राचा जप करावा. अष्टलक्ष्मी प्राप्त होईल असे मानतात. 

मंत्र - ॐ श्रीं ह्यीं श्रीं कमले कमलालये प्रसीद
प्रसीद श्रीं ह्यीं श्रीं महालक्ष्म्यै नम:। 

पुढे पहा कुबेर यंत्र


webdunia
WD


कुबेर यंत्र : धनशक्तीचे मालक आणि देवतांच्या कोषांचे धनपती कुबेर यांचे आशीर्वाद जीवनभर आवश्यक असतो. या यंत्राची स्थापना चांदी किंवा अष्टगंध यांच्या साहाय्याने केली जाते. धनत्रयोदशी ते दिवाळीपर्यंत कुबेर मंत्राचा जप केल्याने कुबेराची विशेष कृपादृष्टी प्राप्त होते आणि संपत्तीत वाढ होते.

मंत्र - ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय

धन धान्यादिपतये समृद्धी मे देहिदापय स्वाहा।

पुढे पहा श्री व्यापार वृद्धी यंत्र


webdunia
WD


श्री व्यापार वृद्धी यंत्र : या यंत्राची स्थापना भोजपत्र किंवा कोऱ्या कागदावर करता येते. धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजेपर्यंत रोज रात्री २१ माळा जप केल्याने यंत्राला जागेवर ठेवावे. व्यापारात प्रगती होईल.

मंत्र - ॐ श्रीं ॐ।

पुढे पहा श्री दुर्गा बीसा यंत्र


webdunia
WD


श्री दुर्गा बीसा यंत्र : या यंत्राची निर्मिती अंकापासून होते. कोऱ्या कागदावर लाल रंगाने हे यंत्र बनवू शकतो. या यंत्रासमोर नवार्ण मंत्राचा जप केल्यास धनप्राप्तीत बाधा येत नाही.

मंत्र - ॐ ऐं ह्रींक्लीं चामुण्डाये विच्च।

पुढे पहा कनकधारा यंत्र


webdunia
WD


कनकधारा यंत्र : आदिशंकराचार्याच्या कृपेने या यंत्राची प्राप्ती झाली. हे यंत्र भोजपत्र, कागद किंवा धातूवर स्थापना करून धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजेपर्यंत याची पूजा करावी. धनाचा तुटवडा भासत नाही.

मंत्र - ॐ श्रीं नम:।

पुढे पहा श्री महालक्ष्मी यंत्र


webdunia
WD


श्री महालक्ष्मी यंत्र : हे यंत्र सर्वश्रेष्ठ बीसा यंत्र मानले जाते. हे यंत्र दिवाळीच्या रात्री सिंदूराने बनवावे. आणि लक्ष्मीपूजन झाल्यानंतर ते तिजोरीत ठेवावे. आर्थिक कष्ट नष्ट होतील.

मंत्र - ॐ श्रीं श्रिये श्रीं नम:।

पुढे पहा शांतीकरं यंत्र


webdunia
WD
शांतीकरं यंत्र : या यंत्राला दिवाळीच्या मध्यरात्री सिंह लग्नात गुरूचंद कस्तुरी कुंकू आणि कापूराने चमेलीच्या फांदीने भोजपत्रावर बनवावे. या नंतर याची प्राणप्रतिष्ठा करावी. त्यानंतर चण्डीची आराधना व ब्राम्हण भोजन झाल्यानंतर हे यंत्र धारण करावे. यामुळे क्लेष, अशांती दूर होऊन सौख्य प्राप्त होते असं मानतात.

मंत्र - ॐ ऐं ह्यीं क्लीं चामुण्डाये विच्च।


Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धनलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी राशीनुसार दिवा लावा?