दिवाळीच्या दिवशी झाडू खरेदी करणे शुभ मानले गेले आहे. या दिवशी केरसूणीची पूजा केल्यानंतर वापरल्याने अनेक वास्तू दोष नाहीसे होतात. तसेही झाडूचा अपमान केल्याने देवी लक्ष्मीचा अपमान होतो असे मानले गेले आहे.
तर जाणून घ्या झाडूशी निगडित काही धार्मिक मान्यता-
दिवाळीच्या दिवशी स्थायी लक्ष्मीचा वास हवा असल्यास शुभ मुहूर्तावर झाडू दान केली पाहिजे.
वास्तु शास्त्रानुसार झाडू उघडण्यात ठेवू नये.
झाडू वापरत नसाल तेव्हा झाडू नजरेसमोर नसावी.
उत्तर दिशेकडे झाडू लपवून ठेवावी.
प्रमुख दरापासून झाडू दिसणे योग्य नाही.
झाडू कधी देवघर, भंडार गृह किंवा बेडरुममध्ये ठेवू नये.
झाडू उभी ठेवू नये.
खूप दिवसांपासून वापरत असलेली झाडू घरात ठेवू नये, त्याऐवजी नवीन आणावी.
जुनी झाडू शनिवारी बदलावी.