धनत्रयोदशीला धन्वंतरी, कुबेर, यम, लक्ष्मी, वामन, गणपती आणि पाळीव पशूंची पूजा केली जाते. या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये 13 पटीने वृद्धी होते. तर जाणून घ्या या दिवशी कोणत्या चार अशा वस्तू आहे ज्या खरेदी केल्याने आपल्याला धनलाभ होऊ शकतो.
1. भांडी : धनत्रयोदशीला सर्वात आधी भांडी खरेदी करणे शुभ ठरतं. भांड्यांमध्ये पितळाची भांडी अवश्य खरेदी करावी. या दिवशी धन्वंतरी देव अमृत कलश घेऊन समुद्रातून बाहेर निघाले होते असे म्हणतात.
2. सोनं : सोनं देखील पिवळं असतं. या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ ठरेल.
3. कवड्या : जुन्या काळात कवड्याच शिक्क्याच्या रूपात प्रचलित होत्या. म्हणतात समुद्र मंथन दरम्यान जेव्हा लक्ष्मीजी प्रकट झाली तेव्हा त्यांच्यासोबत कवड्या देखील होत्या. धनत्रयोदशीला कवड्या खरेदी करा आणि त्या पिवळ्या नसतील तर त्यांना हळदीच्या पाण्यात घोळून पिवळा रंग द्या. नंतर त्यांची पूजा करून तिजोरीत ठेवा.
4. धणे : धनत्रयोदशीला धण्याच्या बिया खरेदी करतात आणि शहरात लोकं धणे खरेदी करतात. या दिवशी धणे खरेदी करणे शुभ मानले गेले आहे. याने धनाचा नुकसान होत नाही.