Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 22 April 2025
webdunia

नरक चतुर्थी

धनतेरस

वेबदुनिया

कार्तिक कृष्ण पक्ष चतुदर्शीला नरक चतुर्थी साजरी केली जाते. यादिवशी लोक घरांची साफसफाई करतात. शारीरीक स्वच्छतेला विशेष महत्त्व आहे. सूर्यादयापूर्वी उठून तेल-उटणे लावून स्नान केले पाहिजे. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून जे लोक स्नान करत नाहीत, वर्षभर त्यांच्या मागे दारिद्र्य आणि संकट पाठ सोडत नाही, असे मानले जाते. 
पौराणिक महत्त्व 
या दिवशी श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता.

हे व्रत केल्यावर नरकापासून मुक्ती मिळते. रामभक्त हनुमानाचा जन्म याच दिवशी झाला होता.

विशेष स्नान 
चंद्रोदयव्यापिनी चतुर्दशीला सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल आणि उटणे लावून स्नान करावे. त्यावेळी खालील मंत्र म्हणावा. 'यमलोकदर्शनाभावकामोऽअभ्यंगस्नान करिष्ये।' या दिवशी गव्हाच्या पिठाचा एक दिवा तयार करून त्यात तिळाचे तेल टाकून, दिव्याच्या चारही बाजूला कापसाची वात लावून दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर पूर्वेला तोंड करून अक्षता आणि फुलांनी पूजा करावी. 

त्यासाठी खालील मंत्र बोलून देवालयात दिवा लावा.

'दत्तो दीप: चतुर्दश्यां नरक प्रीतये मया।।
चतु : वर्ती समायु सर्वपापापनुत्तये।।'

संध्याकाळी घर, दुकान, कार्यालय आदी प्रज्वलित दिव्यांनी अलंकृत करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अकाली मृत्यू टाळण्यासाठी धनत्रयोदशीला लावा दिवा