Narak Chaturdashi 2025:अभ्यंग स्नानाचा धार्मिक अर्थ आणि योग्य पद्अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जातो. याला रूप चौदस आणि नरक निर्वाण चतुर्दशी,छोटी दिवाळी असेही म्हणतात. नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करतात, या दिवशी अभ्यंग स्नान करण्याचं महत्त्व आहे. जे या उत्सवाच्या मुख्य पैलूंपैकी एक आहे. हिंदू मान्यतेनुसार, जे लोक नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करतात ते स्वतःला नरकात जाण्यापासून रोखू शकतात.
नरक चतुर्दशी 2025 महत्त्व
या दिवशी कृष्ण, सत्यभामा आणि काली यांनी नरकासुर राक्षसाचा वध केला. या दिवशी भाविक लवकर उठतात आणि आंघोळीपूर्वी अंगावर सुगंधी तेल लावतात आणि सुगन्धी उटण्याने अंघोळ करतात. नवीन वस्त्रे परिधान करतात. आणि देवळात जाऊन कृष्णाचे किंवा विष्णूंचे दर्शन करतात. संध्याकाळी फटाक्यांची आतषबाजी करून उत्सवाचा आनंद लुटला जातो.
या दिवशी पुरुषांच्या अभ्यंगस्नानाचे विशेष महत्त्व आहे. सूर्योदयापूर्वी तिळाचे तेल लावतात. असं केल्याने त्यांचे गरिबी आणि दुर्दैवापासून संरक्षण होते या विश्वासाने हे सण साजरे केले जाते. असे मानले जाते की या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने लोक नरकात जात नाही.
या दिवशी दिवे लावणे आणि पूजा करणे महत्त्वाचे असले तरी, सर्वात खास विधी म्हणजे स्नान करणे आणि उटणे लावणे. हा विधी शरीर शुद्ध करण्यासाठी आणि त्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी केला जातो.
शुद्धीकरण आणि पवित्रता: अभ्यंग स्नानामुळे शरीर आणि मन शुद्ध होते. तेलाने मालिश केल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, असे मानले जाते.
देवतांचे आशीर्वाद: सणांच्या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने लक्ष्मी, विष्णू किंवा इतर देवतांचे आशीर्वाद मिळतात. विशेषतः दिवाळीच्या नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान केल्याने नरकापासून मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे.
आयुर्वेदिक महत्त्व: आयुर्वेदानुसार, अभ्यंग स्नानामुळे त्वचा, स्नायू आणि सांधे निरोगी राहतात. याला धार्मिकदृष्ट्या "देहशुद्धी" आणि "आत्मशुद्धी" चा भाग मानले जाते.
पापांचे प्रायश्चित्त: काही शास्त्रांनुसार, अभ्यंग स्नानामुळे पापांचे प्रायश्चित्त होते आणि व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धी येते.
ऋतूंनुसार महत्त्व: थंडीच्या काळात (हिवाळ्यात) अभ्यंग स्नान केल्याने शरीराला उष्णता मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते, जे धार्मिक आणि शारीरिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते.
अभ्यंग स्नानाची योग्य पद्धत:
साहित्य:
तेल: तिळाचे तेल, नारळाचे तेल किंवा आयुर्वेदिक औषधी तेल
उटणे: उटणे हे चंदन, हळद, बेसन, दूध, गुलाबपाणी यांचे मिश्रण असते. याचा उपयोग त्वचेची शुद्धी आणि चमक वाढवण्यासाठी होतो.
स्नानासाठी पाणी: गरम किंवा कोमट पाणी.
अभ्यंग स्नान सकाळी लवकर, सूर्योदयापूर्वी (ब्रह्ममुहूर्तावर) करणे शुभ मानले जाते.
पद्धत:
संकल्प: स्नानापूर्वी स्वच्छ कपडे घालून, देवापुढे दिवा लावून संकल्प करा. उदाहरणार्थ, "मी आज अभ्यंग स्नान करून शरीर आणि मन शुद्ध करतो/करते आणि देवाचे आशीर्वाद मिळवतो/मिळवते."
तेल मालिश: संपूर्ण शरीरावर तिळाचे किंवा औषधी तेल लावून हलक्या हाताने मालिश करा. विशेषतः डोके, कान, हात, पाय, पाठ यावर लक्ष द्या. तेल 15-20 मिनिटे शरीरावर राहू द्या.
उटणे लावणे: तेल मालिश केल्यानंतर उटणे संपूर्ण शरीरावर लावून हलक्या हाताने घासा. यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून त्वचा स्वच्छ आणि मऊ होते.
स्नान: कोमट पाण्याने स्नान करा. साबणाऐवजी नैसर्गिक साहित्य उदा., बेसन, वापरणे चांगले.
पूजा आणि दान: स्नानानंतर स्वच्छ कपडे परिधान करून देवाची पूजा करा. शक्य असल्यास गरजूंना दान द्या.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit